Weather update : आता देशावर दुहेरी संकट, पुढच्या 24 तासांमध्ये तब्बल…, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या दीड महिन्यांपासूनच पाऊसच झालेला नाही. त्यामुळे दुष्काळ पडला आहे. खरीप हंगामातील पिंक सुकून गेली आहेत. मात्र आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे. पावसाच्या तुटीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक राज्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे परतीचा पाऊस देशभरात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. मात्र या पावसासोबतच आणखी एक मोठं संकट देखील घोंघावत आहे. भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 13 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच या काळात वाऱ्याचा वेग देखील 70 ते 80 किमी प्रति तास एवढा प्रचंड असणार आहे, असा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पुढील 48 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पर्वतीय प्रदेशातील लोकांनी विशेष सतर्कता बाळगावी कारण या काळात अशा ठिकाणी लँडस्लाइडच्या घटना घडू शकतात. तसेच जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी असं भारतीय हवामान विभाग ( IMD) ने म्हटलं आहे. जोरदार पावसामुळे काही राज्यांमध्ये पिकांचं देखील नुकसान होण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातून या काळात जोरदार वारे वाहणार आहेत.
या राज्यांना पावसाचा हाय अलर्ट
पुढील 24 तासांमध्ये देशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 13 राज्यांना पावसाचा हाय अर्लट देण्यात आला आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच या काळात 70 ते 80 किमी प्रति तास एवढ्या प्रचंड वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
दरम्यान या काळात महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यात कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यात बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर, तसेच विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
