RR vs CSK : दोन युवा खेळाडूंनी चेन्नईचा काढला घाम, विजयासाठी इतक्या धावांचं आव्हान

पहिल्यांदा बॅटींग करताना राजस्थान संघाने 202 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली आहे.

RR vs CSK : दोन युवा खेळाडूंनी चेन्नईचा काढला घाम, विजयासाठी इतक्या धावांचं आव्हान
| Updated on: Apr 27, 2023 | 9:39 PM

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. संजू सॅमसन याने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटींग करताना राजस्थान संघाने 202 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली आहे. शेवटला ध्रुव जुरेल याने 15 चेंडूत 34 धावा केल्या आहेत. सीएसकेकडून तुषार देशपांडे 2, रविंद्र जडेजा 1 आणि महेश तीक्ष्णा यांनी 1 विकेट घेतल्या.

चेन्नईने जोस बटलर 27 धावा , संजू सॅमसन 17 धावा, शिमरन हेटमायर 8 धावा यांना मोठी  खेळी करू दिली नाही. मात्र यशस्वी जयस्वाल 77 धावा आणि ध्रुव जुरेल 34 आणि पडिक्कलनेही नाबाद 27 धावा करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला.

राजस्थान रॉयल्स संघाचे महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्यावर संघ 170 धावा करण्यातही यशस्वी ठरतील की नाही शंका होती. मात्र आधी जयस्वाल त्यानंतर ध्रुव जुरेल आणि पडिक्कल यांनी चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पडिक्कलनेही शेवटला येत आक्रमक फटकेबाजी करत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (w/c), शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एडम ज़म्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेवन): ऋुतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा