DC vs RR IPL 2022: असं वाटलं, अश्विन पीचवर बसतोय पण त्याने थेट SIX मारला, Must Watch Video

| Updated on: May 11, 2022 | 10:34 PM

DC vs RR IPL 2022: आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात अश्विनला वरती बढती देण्यात आली. त्याला वनडाउन फलंदाजीला पाठवण्यात आलं.

DC vs RR IPL 2022: असं वाटलं, अश्विन पीचवर बसतोय पण त्याने थेट SIX मारला, Must Watch Video
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: प्रसिद्ध क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) क्रिकेटच्या ज्ञानासाठी ओळखला जातो. त्याला क्रिकेटची चांगली समज आहे. सतत बदल करत रहाणं, ही अश्विनची खासियत आहे. त्यामुळे हुशार क्रिकेटपटूंमध्ये अश्विनची गणना होते. अश्विन भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज (Spinner) आहे. सतत गोलंदाजीमध्ये बदल, वैविध्य याचा शोध अश्विन घेत असतो. याच गुणांमुळे अश्विन अजूनही भारतीय संघात (Indian Team) आपलं स्थान टिकवून आहे. फक्त गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीतही अश्विन नेहमीच योगदान देत आलाय. भारताने अनेकदा अश्विनच्या फलंदाजीच्या बळावर सामने जिंकले आहेत. अश्विनची फलंदाजी पाहून तो परिपूर्ण फलंदाजच वाटतो. याच गुणांमुळे राजस्थानने यंदाच्या सीजनमध्ये अश्विनला अनेकदा वरती फलंदाजीला पाठवलं आहे.

एक वेगळीच कृती केली

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात अश्विनला वरती बढती देण्यात आली. त्याला वनडाउन फलंदाजीला पाठवण्यात आलं. अश्विनने सुद्धा मिळालेल्या संधीचा अचूक फायदा उचलला. त्याने 38 चेंडूत 50 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते. अश्विनने आज फलंदाजी करताना एक वेगळीच कृती केली. त्यामुळे स्टेडियमवर उपस्थित असणारे आणि सामना पहाणारे सर्वच जण चक्रावून गेले.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला

याआधी सुद्धा या सीजनमध्ये अश्विन रिटायर आऊटच्या निर्णयामुळे चर्चेत आला होता. बाद नसतानाही किंवा कुठलीही दुखापत नसताना अश्विन पंचांना सांगून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अश्विनने आपल्या वेगळ्याच स्टान्सने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. राजस्थान रॉयल्ससाठी अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. अश्विनने डावाच्या सुरुवातीला काही चांगले फटकेही खेळले. पण स्पिनर्स गोलंदाजीला आले त्यावेळी त्याने विचित्र स्टान्स घेतला.

देवदत्त पडिक्कल सोबत भागीदारी

दिल्लीचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव बॉलिंग करत होता. त्यावेळी अश्विन खूपच खाली वाकला. जणू असं वाटलं की, तो खेळपट्टीवरच बसतोय. वेगवान गोलंदाजांना खेळतानाही अश्विनने असाच स्टान्स घेतला. कुलदीपच्या गोलंदाजीवर त्याच स्टान्सने त्याने षटकारही ठोकला. तिसऱ्या विकेटसाठी देवदत्त पडिक्कल सोबत त्याने 53 धावांची भागीदारी केली.