Deepak Chahar : दीपक चहरच्या घरातून गुड न्यूज… लग्नाचा Deepak Chahar : दीपक चहरच्या घरातून गुड न्यूज… लग्नाचा बँडबाजा वाजणार, कुणी दिली मोठी हिंट?वाजणार, कुणी दिली मोठी हिंट?
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने चाहत्यांना वेड लावणार दीपक चहर सध्या त्याच्या लग्नाच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. दिपकच्या घरात लवकरच बेंडबाजा वाजणार असल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने चाहत्यांना वेड लावणार दीपक चहर सध्या त्याच्या लग्नाच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. बहिणीच्या वाढदिवसानिमित्त त्याने शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिपकने इन्स्टाग्रामवर मालतीसोबत म्हणजेच त्याच्या बहिणीसोबत एक धमाल व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मालती फोनवर बोलत आहे आणि चहर मागून येऊन तिला घाबरवतो म्हणून मालती जोरात ओरडत आणि दोघेही हसू लागतात.
पण या व्हिडिओसोब दिपकने दिलेले कॅप्शन अधिक लक्ष वेधून घेणारे आहे. त्याने बहिणीला हा व्हिडिओ पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅप्पी बर्थडे सिस्टर मालती चहर...देव करो, यावर्षी तुला एक चांगला नवरा मिळो.' अशा आशयाचे ते गंमतीशीर कॅप्शन आहे.
दीपकच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मालतीला शुभेच्छाही दिल्या आहेत, तर काहींनी दोघांच्या नात्याचे कौतुक केले आहे. मालतीचं यंदा खरचं लग्न होणार का ? असा प्रश्नही काही चाहत्यांनी विचारला आहे.
दरम्यान मालती चहर ही केवळ क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण म्हणूनच ओळखली जात नाही. तर ती अभिनेत्री आणि दिगदर्शिकाही आहे. तिने 'मिस इंडिया' सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसंच बिग बॉस रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.