GG vs DC : 10 फोर, 5 SIX, Shafali Verma ची धुवाधार बॅटिंग, फक्त 34 मिनिटात संपवली मॅच

| Updated on: Mar 12, 2023 | 9:03 AM

GG vs DC : एकहाती सामना कसा फिरवला जातो, ते शेफाली वर्माने दाखवून दिलं. शेफालीच्या वादळी खेळी समोर समोरची टीम पस्त झाली. तिने धुवाधार बॅटिंग केली. 106 धावांच टार्गेट फक्त इतक्या चेंडूत चेस केलं.

GG vs DC : 10 फोर, 5 SIX, Shafali Verma ची धुवाधार बॅटिंग, फक्त 34 मिनिटात संपवली मॅच
shafali verma
Image Credit source: wpl
Follow us on

GG vs DC : टीम इंडियातील आक्रमक बॅट्समन म्हणून शेफाली वर्माच नाव घेतलं जातं. सध्या सुरु असलेल्या वूमेन्स प्रीमियर लीगमध्ये शेफालीच्या बॅटिंगची ताकत दिसून येतेय. शनिवारी गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना झाला. यावेळी एकहाती सामना कसा फिरवला जातो. ते शेफालीने दाखवून दिलं. दिल्लीची कॅप्टन मेग लेनिंग समोरच्या टोकाला उभी राहून फक्त शेफालीच्या बॅटमधून निघणारे घणाघाती फटके पाहत होती. गुजरात जायंट्स विरुद्धचा सामना दिल्ली कॅपिटल्सने फक्त 34 मिनिटात जिंकला. 20 ओव्हरच्या मॅचमधील टार्गेट फक्त 43 चेंडूत चेस केलं. शेफाली वर्मा WPL मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय खेळाडू बनली.

गुजरात जायंट्सच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून फक्त 105 धावा केल्या. दिल्लीकडून मारिजेन कॅपने भेदक मारा करुन 5 विकेट काढले. कॅपच्या गोलंदाजीमुळे गुजरातची टीम मोठी धावसंख्या उभारु शकली नाही. त्यांचा एकही फलंदाज विकेटवर सेट होऊ शकला नाही.

मनाला वाटेल तशी धुलाई

दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 106 धावांच लक्ष्य होतं. मेग लेनिंग आणि शेफाली वर्मा ही दिल्लीची ओपनिंग जोडी मैदानात उतरली. पहिल्या ओव्हरपासून शेफालीने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. मनाला वाटेल, तसं गुजरातच्या गोलंदाजांना शेफालीने धुतलं.

34 मिनिटात मिळवून दिला विजय

शेफालीने आक्रमक, वेगवान खेळी केली. अखेरपर्यंत तिने मैदानावर नाबाद राहत 28 चेंडूत 76 धावा चोपल्या. यात 10 चौकार आणि 5 सिक्स होते. शेफाली 34 मिनिट क्रीजवर होती. या 34 मिनिटात तिने दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला.


WPL मध्ये वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर?

शेफालीने तिच्या 76 धावांच्या इनिंग दरम्यान फक्त 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. WPL मध्ये वेगवान अर्धशतक झळकवणारी शेफाली वर्मा पहिली भारतीय खेळाडू बनली. टुर्नामेंटमधील हे दुससं वेगवान अर्धशतक आहे. याआधी सोफिया डंकलेने 18 चेंडूत वेगवान अर्धशतक झळकवलय,
फक्त इतक्या ओव्हरमध्ये गाठलं 106 धावांच टार्गेट

शेफालीशिवाय मेग लेनिंग सुद्धा 34 मिनिट क्रीजवर होती. तिने 15 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. 106 धावांच गुजरातच टार्गेट दिल्लीच्या टीमने 7.1 ओव्हरमध्येच गाठलं. दिल्लीने 10 विकेट राखून मोठा विजय मिळवला.