DC vs KKR Live Streaming : दिल्ली-केकेआरमध्ये टफ फाईट, 2 गुणांसाठी कडवी झुंज, कोण जिंकणार?

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders IPL 2026 Live Scorecard : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 51 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना होणार आहे. जाणून घ्या सामन्याबाबतची महत्त्वाची माहिती आणि बरंच काही.

DC vs KKR Live Streaming : दिल्ली-केकेआरमध्ये टफ फाईट, 2 गुणांसाठी कडवी झुंज, कोण जिंकणार?
DC vs KKR IPL 2026 LIve Streaming
Image Credit source: news9live.com
| Updated on: May 08, 2026 | 6:52 AM

लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी 7 मे रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करुन आयपीएल 2026 स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं. लखनौने डीएलनुसार 213 धावांचा यशस्वी बचाव करत आरसीबीला 19 ओव्हरमध्ये 6 आऊट 203 धावांवर रोखलं. लखनौने अशाप्रकारे 9 धावांनी सामना जिंकला. त्यानंतर आता शुक्रवारी आणखी एक चुरशीचा सामना होणार आहे. या सामन्यात पॉइंट्स टेबलमधील सातव्या आणि आठव्या स्थानी असलेल्या संघांत कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट्स रायडर्स यांच्यात हा सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना प्लेऑफच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या निमित्ताने सामन्याबाबत माहिती जाणून घेऊयात.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कधी?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना शुक्रवारी 8 मे रोजी होणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली इथे होणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईलवर पाहता येईल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दिल्ली विरुद्ध कोलकाता यांच्यातील शुक्रवारी होणार हा स्पर्धेच्या इतिहासातील 36 वा सामना असणार आहे. याआधीच्या 35 पैकी सर्वाधिक सामन्यांत केकेआर दिल्लीवर वरचढ राहिली आहे. केकेआरने दिल्लीला 19 सामन्यांत पराभूत केलं आहे. तर दिल्लीने 15 सामन्यांमध्ये मैदान मारलं आहे. आता 36 व्या सामन्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

दरम्यान दिल्ली आणि केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये पुढेमागे आहेत. दिल्लीने 10 पैकी 4 सामने जिंकलेत तर उर्वरित सामन्यांत त्यांचा पराभव झालाय. तर केकेआरची दिल्लीपेक्षा वाईट स्थिती आहे. केकेआरने 9 पैकी 3 सामने जिंकलेत. 6 सामने गमावलेत. तर 1 सामना पावसाने वाया घालवलाय. केकेआरच्या खात्यात 7 तर दिल्लीच्या नावावर 8 गुण आहेत.

Follow Us