DC vs MI Live Score, IPL 2026: बुमराहचा कडक थ्रो, नितीश राणा रन आऊट, दिल्ली दुसरा झटका

Delhi Capitals vs Mumbai Indians Indian Premier League 2026 Live Score : दिल्ली कॅपिट्ल्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आपला एकूण दुसरा तर घरच्या मैदानातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 हात करत आहेत. या सामन्यातील प्रत्येक घडामोड लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

DC vs MI Live Score, IPL 2026: बुमराहचा कडक थ्रो, नितीश राणा रन आऊट, दिल्ली दुसरा झटका
Delhi Capitals vs Mumbai Indians IPL 2026 Live Score
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 04, 2026 | 5:46 PM

LIVE Cricket Score & Updates

  • 04 Apr 2026 05:46 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : बुमराहचा कडक थ्रो, नितीश राणा रन आऊट, दिल्ली दुसरा झटका

    जसप्रीत बुमराह याने त्याच्या पहिल्या आणि दिल्लीच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट मिळवली आहे. बुमराहने त्याच्या बॉलिंगवर नितीश राणा याला नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट केलं. त्यामुळे दिल्लीचा स्कोअर 2 आऊट 7 असा झाला आहे.

  • 04 Apr 2026 05:45 PM (IST)

    सुरत- नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार, सात जखमी

    सुरत- नागपूर महामार्गावर साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात

    क्रुझर गाडी उलटून अपघातात, 2 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती

    अपघातामध्ये सात जण जखमी

    जखमींना उपचारासाठी साखरे ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले दाखल

  • 04 Apr 2026 05:42 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : दिल्लीला पहिला झटका, केएल राहुल आऊट

    मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला आहे. दीपक चाहर याने केएल राहुल याला विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती 1 धावावेर कॅच आऊट केलं.

  • 04 Apr 2026 05:20 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : दिल्लीसमोर 163 धावांचं आव्हान, मुंबई जिंकणार?

    दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यातील पहिला डाव आटोपला आहे. मुंबईने दिल्लीसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. मुंबईसाठी कॅप्टन सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर दिल्लीसाठी मुकेश कुमार याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

  • 04 Apr 2026 05:09 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : मुंबईला सहावा धक्का, नमन धीर आऊट

    दिल्लीने मुंबईला सहावा धक्का दिला आहे. सेट नमन धीर आऊट झाला आहे. टी नटराजन याने नमन धीर याला ट्रिस्टन स्टब्स याच्या हाती कॅच आऊट केलं. नमनने 21 बॉलमध्ये 28 रन्स केल्या. नमनने या दरम्यान 1 सिक्स आणि 2 फोर लगावले.

  • 04 Apr 2026 04:51 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : कॅप्टन सूर्या अर्धशतकानंतर आऊट, मुंबईला पाचवा धक्का

    लुंगी एन्गिडी याने मुंबई इंडिनय्सला पाचवा आणि सर्वात मोठा झटका दिला आहे. लुंगीने कॅप्टन सूर्यकुमार यादव याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. सूर्याने 36 बॉलमध्ये 51 रन्स केल्या. सूर्याने या दरम्यान 2 सिक्स आणि 3 फोर लगावले.

  • 04 Apr 2026 04:47 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : कॅप्टन सूर्याची झुंजार खेळी, दिल्ली विरुद्ध अर्धशतक

    कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध निर्णायक क्षणी अर्धशतक झळकावलं आहे. सूर्याने 35 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह हे अर्धशतक पूर्ण केलं.

  • 04 Apr 2026 04:38 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : मुंबईला चौथा धक्का, शेरफेन रुदरफोर्ड आऊट, पलटण पुन्हा बॅकफुटवर

    दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईला चौथा झटका देत पुन्हा बॅकफुटवर टाकलं आहे. अक्षर पटेल याने रोहित शर्मा याला आऊट केलंं.  त्यानंतर विपराज निगम याने शेरफेन रुदरफोर्ड याला मुकेश कुमार याच्या हाती कॅच आऊट केलं. शेरफेन याने 5 धावा केल्या.

  • 04 Apr 2026 04:28 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : रोहित शर्मा आऊट, मुंबईला तिसरा झटका

    दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईला तिसरा आणि मोठा झटका दिला आहे. अक्षर पटेल याने सेट रोहित शर्मा याला आऊट केलं आहे. रोहितने 26 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने एकूण 35 धावा केल्या.

  • 04 Apr 2026 04:20 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : रोहित-सूर्या जोडी जमली, मुंबईचं जोरदार कमबॅक

    मुकेश कुमार याने मुंबईला डावातील तिसऱ्या ओव्हरमध्य 2 झटके दिले. मुकेशने रायन रिकेल्टन आणि तिलक वर्मा या दोघांना आऊट केलं. त्यामुळे मुंबईची 2.5 ओव्हरमध्ये 2 आऊट 18 अशी स्थिती झाली. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी मुंबईला 9 ओव्हरपर्यंत 2 आऊट 69 धावांपर्यंत पोहचवलं.

  • 04 Apr 2026 03:55 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : रायननंतर तिलक वर्मा आऊट, मुकेश कुमारकडून मुंबईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके

    दिल्ली कॅपिट्ल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने मुंबईला तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. मुकेशने आधी तिसऱ्या बॉलवर रायन रिकेल्टन याला अक्षर पटेल याच्या हाती 9 रन्सवर कॅच आऊट केलं. त्यानंतर मुकेशने तिलकला पाचव्या बॉलवर कॅच आऊट केलं. तिलकला भोपळाही फोडता आला नाही.ं

  • 04 Apr 2026 03:46 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : मुंबईला पहिला झटका, रायन रिकेल्टन आऊट

    दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सला पहिला झटका दिला आहे. मुकेश कुमार याने रायन रिकेल्टन याला तिसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅप्टन अक्षर पटेल याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 9 धावा केल्या.

  • 04 Apr 2026 03:37 PM (IST)

    DC vs MI Live Score Updates : सामन्याला सुरुवात, मुंबईची बॅटिंग, रोहित-रिकेल्टन मैदानात

    दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 04 Apr 2026 03:14 PM (IST)

    DC vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (डब्ल्यू), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.

  • 04 Apr 2026 03:13 PM (IST)

    DC vs MI Live Updates : दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन

    दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हीड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुकेश कुमार.

  • 04 Apr 2026 03:03 PM (IST)

    DC vs MI Live Updates : दिल्लीने टॉस जिंकला, मुंबई विरुद्ध निर्णय काय?

    दिल्ली कॅपिट्ल्सने मुबई इंडियन्स विरुद्ध टॉस जिंकला आहे.  कॅप्टन अक्षर पटेल याने अरुण जेटली स्टेडियममध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 04 Apr 2026 02:48 PM (IST)

    DC vs MI Live Updates : दिल्ली-मुंबई हेड टु हेड रेकॉर्ड्स

    मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 37 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने त्यापैकी 21 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 16 सामने जिंकले आहेत.

  • 04 Apr 2026 02:36 PM (IST)

    DC vs MI Live Updates : दिल्ली कॅपिट्ल्स टीम

    पथुम निसांका, नितीश राणा, समीर रिझवी, अक्षर पटेल(कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार, आशुतोष शर्मा, आकिब नबी दार, दुष्मंथा चमीरा, करुण नायर, मिचेल स्टार्क, काइल जेमिसन, अजय जाधव मंडल, पृथ्वी शॉ, त्रिपुराण विजय, अभिषेक पोरेल, साहिल पारख आणि माधव तिवारी.

  • 04 Apr 2026 02:26 PM (IST)

    DC vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, शार्दुल ठाकुर, मयंक मार्कंडे, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंझ, राज बावा, अश्वनी कुमार, दीपक चहर, क्विंटन डी कॉक, मिचेल सँटनर, विल जॅक्स, मयंक रावत, रघु शर्मा, अथर्व अंकोलेकर, दानिश मालेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.

  • 04 Apr 2026 02:21 PM (IST)

    DC vs MI Live Updates : दिल्ली विरुद्ध मुंबई सामना

    आयपीएल 2026 च्या आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 5 वेळा चॅम्पियन असलेली मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) पहिल्या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंडमध्ये अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी मोसमात विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा ही विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र यात कोणता तरी 1 संघ यशस्वी ठरेल तर दुसऱ्या संघाला पराभूत व्हावं लागणार, हे स्पष्ट आहे. अशात या सामन्यात कोणता संघ मैदाना मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने आपण या सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Follow Us