IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका, हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

IPL 2024 Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका लागला आहे. चेन्नईचा स्टार फलंदाज दुखापतीमुळे आयपीएलच्या 17 व्या मोसमातून बाहेर झाला आहे.

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका, हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
chennai super kings ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 3:51 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 19 एप्रिल रोजी भिडणार आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका लागला आहे. चेन्नईचा स्टार ओपनर बॅट्समन डेव्हॉन कॉन्वहे हा दुखापतीमुळे आयपीएलच्या 17 व्या मोसमातून बाहेर पडला आहे. त्यामुळे चेन्नईला हा हादरा बसला आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. डेव्हॉनला दुखापतीमुळे या हंगामातील एकही सामना खेळता आला नाही. आता डेव्हॉनच्या जागी एका खेळाडूचा चेन्नई टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. चेन्नई टीममध्ये इंग्लंडच्या रीचर्ड ग्लीसन याचा समावेश करण्यात आला आहे.

आयपीएलच्या सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, डेव्हॉनला दुखापतीमुळे खेळता येणार नसल्याने तो स्पर्धेतून बागेर पडला आहे. चेन्नईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डेव्हॉनने 23 सामन्यात 924 धावा केल्या आहेत. डेव्हॉनने या दरम्यान 9 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच डेव्हॉनची नाबाद 92 हा सर्वोच्च धावसंख्या आहे. डेव्हॉनच्या जागी संधी मिळालेल्या रीचर्च ग्लीसन याने इंग्लंडचं 6 टी 20 आय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रीचर्डने 9 टी 20 आय विकेट्स घेतल्या आहेत. तसेच रीचर्डने 90 टी 20 सामन्यांमध्ये 110 विकेट्सही घेतल्या आहेत. रीचर्डला चेन्नईने 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी महेंद्रसिंह धोनी याने युवा ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपदाची सूत्र दिली. ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईने खेळलेल्या 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. चेन्नई 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर चेन्नईला दिल्ली कॅपिट्ल्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. चेन्नईने अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये पराभूत केलं.

चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका

चेन्नई सुपर किंग्स अपडेटेड टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), एमएस धोनी, अरावेली अवनीश, रिचर्ड ग्लेसन, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू. चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकुर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.