वाढती उष्णता, बदलत्या हवामानामुळे लोकं होतात बेशुद्ध, जाणून घ्या कारण आणि लाभदायक उपाय
Heat Wave | वाढती उष्णता, बदलत्या हवामानामुळे त्रासले आहेत लोकं, प्रवास करताना आणि इतर वेळी काही गोष्टींची काळजी नक्की घ्या... जाणून घ्या कारण आणि लाभदायक उपाय... वाढत्या उष्णतेमुळे लोकांना कमी भूक, डिहायड्रेशन आणि उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे..
उष्णतेचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. अशात स्वतःची काळजी घेणं कठीण झलेलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्याही तुम्हाला त्रास देऊ लागतात. वाढत्या उष्णतेमुळे लोकांना कमी भूक, डिहायड्रेशन, चक्कर येणे… यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर बीपीचा त्रास असणाऱ्या लोकांना देखील अनेक अडचणी येत आहेत. कडाक्याच्या उन्हात चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, अशक्तपणा जाणवणे, अशा समस्या समोर येत आहेत.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता याबद्दल जाणून घेऊ या. पण कोणताही उपाय करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या… ज्यामुळे तुमच्या आरोग्यस कोणता धोका निर्माण होणार नाही.. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काही उपाय…
पाणी पिण्याचं प्रमाम वाढवा. शरीरात पाणी कमी असल्यामुळे चक्कर आणि अशक्तपणा वाटतो. अशात पणी अधिक प्याल्यास तुम्हाला अशक्तपणा जाणवरणार नाही..
स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी, रसाळ फळांचा आहारात समावेश करुन घ्या.
चहा – कॉफी पिण्याचं प्रमाण कमी ठेवा. ज्यामुळे यूरिन प्रॉडक्शन वाढण्याची शक्यता असते. चहा – कॉफी पिण्याच्या एक तास आधी पाणी नक्की प्या…
कोणत्याही कमासाठी बाहेर निघताना चेहरा पूर्णपणे कव्हर करुनच बाहेर निघा.
दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान काम असेल तरच घराबाहेर निघा. वाढत्या उष्णतेमध्ये काम असेल तरच घराबाहेर पडा…
लिंबू आणि मीठ असलेले पाणी देखील कमी रक्तदाबापासून बचाव करण्यास मदत करते. लिंबू आणि मीठ असलेले पाणी आरोग्यास फायदेशीर आहे.
प्रथिने युक्त नाश्ता करा. काही खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तुम्हाला लो बीपीची समस्या असल्यास स्वतःची विशेष काळजी घ्या.
स्ट्रॉबेरी, संत्री, काकडी आणि टरबूज यांचा आहारात समावेश जरूर करा. रसाळ फळांचा शरीरास फायदा होतो.
ताक पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच हलके अन्न खा, जे शरीराला पचायला सोपे जाते.
वाढत्या उष्णतेमध्ये काम झाल्यानंतर स्वतःसाठी वेळ काढा आणि विश्रांती घ्या. पंखे, कुलर आणि एसीच्या मदतीने खोलीचे तापमान राखता येतं. ज्यामुळे शरीरातील वाढणारी उष्णता कमी करता येते. अशा प्रकारे तुम्ही वाढती उष्णता आणि बदलत्या हवामानामध्ये स्वतःची काळजी घ्या..