ODI World Cup 2027: टीम इंडियातून या खेळाडूला डावलणं अशक्य! का ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असून सुरूवातीच्या काही सामन्यात खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. त्यामुळे टीम इंडियाची दारं येत्या काही दिवसात त्यांच्यासाठी उघडी होतील. असं असताना वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आणखी एक नाव पुढे आलं आहे.

ODI World Cup 2027: टीम इंडियातून या खेळाडूला डावलणं अशक्य! का ते जाणून घ्या
ODI World Cup 2027: टीम इंडियातून या खेळाडूला डावलणं अशक्य, का ते जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 06, 2026 | 9:02 PM

आयपीएल 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चांगली सुरूवात केली आहे. देवदत्त पडिक्कल याने दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या या खेळीमुळे आरसीबीला विजय मिळण्यात हातभार लागला. पडिक्कलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 61, तर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 50 धावांची खेळी केली. त्याची खेळी पाहून क्रीडाप्रेमी आणि जाणकार आश्चर्यचकीत आहेत. त्याच्या फलंदाजीचं कौतुक आरसीबीचा मेंटॉर आणि बॅटिंग कोच दिनेश कार्तिक यानेही केलं आहे. दिनेश कार्तिकच्या मते, पडिक्कलला टीम इंडियाच्या बाहेर ठेवणं कठीण आहे. त्याची स्तुती करताना दिनेश कार्तिक म्हणाला की, त्याच्यात डोकं शांत ठेवून धावा करण्याची क्षमता आहे.

दिनेश कार्तिक म्हणाला की, ‘अवघड खेळपट्टीवर धावा करणं वाटतं तितकं सोपं नसतं. पण या खेळाडूंनी त्यावर मात केली आहे. तसेच चांगला खेळ केला. पडिक्कलने मोठे फटके मारण्याऐवजी स्थितीचं आकलन करून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने एक चौकार मारला, तेव्हा तु्म्ही पाहिलं असेल की या खेळाडूने फलंदाजीचा गिअर कसा बदलला. त्याने क्रिकेटिंग शॉट्स खेळत चेंडू बाउंड्री बाहे पाठवला. हा खेळाडू असाच फलंदाजी करत राहिला तर पडिक्कलला टीम इंडियापासून दूर ठेवणं अशक्य आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने खूप साऱ्या धावा केल्या आहेत.’वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा दीड वर्षांनी होणार आहे. त्यामुळे हा खेळाडू संघात जागा मिळवण्यात यशस्वी ठरू शकतो.

देवदत्त पडिक्कलचा वनडेती रेकॉर्ड चांगला आहे. त्याने आतापर्यंत एकही वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण त्याने लिस्ट ए सामन्यात 82.23 च्या सरासरीने 2796 धावा केल्या आहेत. त्यात 13 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा 92.61 चा आहे. दिनेश कार्तिकने त्याचं कौतुक करताना सांगितलं की, ‘पडिक्कलचं वैशिष्ट्य म्हणजे तो कर्नाटक संघाचा कर्णधार आहे. 25व्या वर्षापासून आपल्या आयडिया शेअर करत आहे. ते पाहून खूप चांगलं वाटतं.’

Follow Us