IND vs NZ 3rd ODI : आजच्या मॅचमध्ये पुन्हा डबल सेंच्युरी पहायला मिळेल? असं म्हणण्यामागे एक ठोस कारणं

| Updated on: Jan 24, 2023 | 10:51 AM

IND vs NZ 3rd ODI : आता न्यूझीलंड विरुद्ध क्लीन स्वीप विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. सीरीज विजयासह आजच्या मॅचमध्ये डबल सेंच्युरी होईल का? यावर सुद्धा लक्ष असेल.

IND vs NZ 3rd ODI : आजच्या मॅचमध्ये पुन्हा डबल सेंच्युरी पहायला मिळेल? असं म्हणण्यामागे एक ठोस कारणं
Team india -
Image Credit source: PTI
Follow us on

इंदोर – भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु आहे. या वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज इंदोर येथे होणार आहे. टीम इंडिय़ाने मालिका आधीच जिंकली आहे. आता न्यूझीलंड विरुद्ध क्लीन स्वीप विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. सीरीज विजयासह आजच्या मॅचमध्ये डबल सेंच्युरी होईल का? यावर सुद्धा लक्ष असेल. आम्ही यासाठी असं म्हणतोय, कारण या मैदानावर आधी एक डबल सेंच्युरी झाली आहे. टीम इंडियात सध्या असे तीन बॅट्समन आहेत, ज्यांनी डबल सेंच्युरी झळकवली आहे.

न्यूझीलंडकडून कोणी डबल सेंच्युरी झळकवलीय?

न्यूझीलंडकून मार्टिन गुप्टिलने डबल सेंच्युरी झळकवली होती. 2015 वर्ल्ड कपमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. त्याच्याशिवाय न्यूझीलंड क्रिकेटमध्ये कोणीही डबल सेंच्युरी झळकवू शकलेलं नाही. आजच्या सामन्यात डबल सेंच्युरी झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. टीम इंडियाकडून एखाद्या बॅट्समनने डबल सेंच्युरी झळकवल्यास फार आश्चर्य वाटणार नाही.

हे सुद्धा वाचा

सेहवागची डबल सेंच्युरी

याच मैदानात इतिहासातील दुसऱ्या द्विशतकाची नोंद झाली होती. वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने पहिला द्विशतक झळकावलं. त्याने मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी कामगिरी केली होती. त्यानंतर मध्य प्रदेशच्याच इंदोरमध्ये सचिनला आदर्श मानणाऱ्या विरेंद्र सेहवागने डबल सेंच्युरी झळकवली. सेहवागने 8 डिसेंबर 2011 मध्ये इंदोरच्या होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध डबल सेंच्युरी झळकवली होती. इंदोरच्या या मैदानात हाय स्केरिंग मॅचेस झाल्यात. इथे धावांचा पाऊस पडतो. याच मैदानात रोहितने श्रीलंकेविरुद्ध टी 20 मध्ये शतक झळकावलं होतं. म्हणूजन आज द्विशतकाची अपेक्षा आहे.

टीम इंडियाच्या बॅट्समनमध्ये ती क्षमता

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त आठ फलंदाजांनी डबल सेंच्युरी झळकवली आहे. यात आठ पैकी पाच भारताचे आहेत. अन्य तीनमध्ये ख्रिस गेल, गुप्टिल आणि पाकिस्तानच्या फखर जमांचा समावेश होतो. भारताकडून सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, इशान किशन आणि शुभमन गिल यांनी डबल सेंच्युरी झळकवलीय. या पाच पैकी तीन बॅट्समन सध्या टीम इंडियाचा भाग आहेत. इशान किशनने बांग्लादेश विरुद्ध डबल सेंच्युरी ठोकली. रोहितने वनडेमध्ये तीनवेळा द्विशतक झळकावलं आहे.