IND vs ENG : इंडिया-इंग्लंड पहिल्या टेस्टआधी स्टार बॉलरला दुखापत, 19 वर्षाच्या गोलंदाजाला बोलावलं

India vs Englnad 1st Test : इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे. स्टार बॉलरला दुखापत झाल्याने टीम मॅनेजमेंटने 19 वर्षीय युवा खेळाडूला संघात स्थान दिलंय.

IND vs ENG : इंडिया-इंग्लंड पहिल्या टेस्टआधी स्टार बॉलरला दुखापत, 19 वर्षाच्या गोलंदाजाला बोलावलं
Test Cricket
Image Credit source: Stu Forster/Getty Images
| Updated on: Jun 11, 2025 | 10:32 AM

भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल हा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. गिल या मालिकेतून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. पहिला सामना हा हेडिंग्ले लीड्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय निवड समितीकडून 16 सदस्यीय संघ जाहीर केलाय. त्यामुळे या 16 पैकी कोणत्या 11 खेळाडूंचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करायचा? हा पेच टीम मॅनेजमेंटसमोर आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडला पहिल्या सामन्याआधी मोठा झटका लागला आहे.

इंग्लंडच्या युवा वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली आहे. जॉश टंग याला दुखापत झालीय. जॉशला नॉर्थम्पटन काउंटीमध्ये इंडिया ए टीमविरुद्धच्या दुसऱ्या अनऑफिशियल टेस्ट मॅचदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे जोश टंग पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन काही दिवसांपूर्वीच जाहीर केली आहे. या प्लेइंग ईलेव्हनमध्ये जोश टंग याचा समावेश आहे.

इंग्लंड दौऱ्याआधी इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचचं आयोजन करण्यात आलं. या मालिकेतील दुसरा सामना 6 ते 9 जून दरम्यान आयोजित करण्यात आला होता. जोशला या सामन्यातील तिसऱ्या दिवशी दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. तसेच जोशने या सामन्यातील शेवटच्या दिवशी फक्त 4 ओव्हर टाकल्या. जोशने या 4 षटकात 27 धावा दिल्या. जोशला झालेली दुखापत किती गंभीर आहे? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र या दुखापतीमुळे जोशवर पहिल्या सामन्यातून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे.

जोश टंगची कामगिरी

जोश टंग  इंडिया ए विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंड लायन्सकडून सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला. जोशने इंडिया ए टीमच्या तनुष कोटीयन आणि अंशुल कंबोज या दोघांना आऊट केलं. मात्र त्यानंतरही जोश महागडा ठरला. जोशने 20.3 ओव्हरमध्ये 4.44 च्या इकॉनमीने 91 रन्स दिल्या.

इंग्लंडच्या डोकेदुखीत वाढ

जोशला दुखापत झाल्याने इंग्लंडचा पाय आणखी खोलात गेला आहे. मार्क वूड, ओली स्टोन आणि गस एटकिन्सन इंग्लंडच्या या तिघांना आधीच दुखापत झाली आहे. त्यामुळे इंग्लंडची अडचण आधीपासूनच वाढलेली आहे. त्यात जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे कमबॅक करु शकला नाही. आता जोशमुळे इंग्लंडचं टेन्शन वाढलं आहे. जोशला दुखापत झाल्याने इंग्लंडने 19 वर्षीय वेगवान गोलंदाज एडी जेक याला कसोटी संघात कव्हर म्हणून समावेश केला आहे.