ENG vs IND : यशस्वी-कॅप्टन शुबमनची शतकं, पंतचं अर्धशतक, पहिला दिवस भारताचा, इंग्लंड विरुद्ध 359 धावा

England vs India 1st Test Day 1 Highligts In Marathi : टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यातील पहिला दिवस आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी 3 विकेट्स गमावून 359 रन्स केल्या.

ENG vs IND : यशस्वी-कॅप्टन शुबमनची शतकं, पंतचं अर्धशतक, पहिला दिवस भारताचा, इंग्लंड विरुद्ध 359 धावा
Rishabh Pant and Shubman Gill IND vs ENG
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 20, 2025 | 11:49 PM

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस यशस्वीरित्या आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 85 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 359 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत ही सलामी जोडी नाबाद परतली आहे. तर त्याआधी यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि केएल राहुल आऊट झाले. साई सुदर्शन याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या 4 फलंदाजांनी जबरदस्त कामगरी केली. त्यामुळे भारताला पहिल्या दिवसातील 3 पैकी 2 सत्र आपल्या नावावर करता आली. तर एकमेव सत्र हे बरोबरीत राहिलं.

टीम इंडियाची बॅटिंग

यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने टीम इंडियाला कडक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 91 धावांची भागीदारी केली. त्यानंतर टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्याने पहिलं सत्र बरोबरीत राहिलं. केएल राहुल 25 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर आऊट झाला. केएलने 78 बॉलमध्ये 8 फोरसह 42 रन्स केल्या. त्यानंतर 26 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर डेब्यूटंट साई सुदर्शन आऊट झाला. साईला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 2 बाद 91 अशी झाली.

शुबमनची अप्रतिम साथ जैस्वालचं ‘यशस्वी’ शतक

त्यानंतर कर्णधार गिल यशस्वीसह लंचनंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात करण्यासाठी सोबत आला. यशस्वी आणि गिल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 163 बॉलमध्ये 129 रन्सची पार्टनरशीप केली. यशस्वीने या दरम्यान त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पाचवं तर इंग्लंडमध्ये पदार्पणातील पहिलं शतक ठोकलं. मात्र त्यानंतर यशस्वी आऊट झाला. यशस्वीने 159 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकार ठोकून 101 रन्स केल्या.

चौथ्या विकेटसाठी 138 धावांची नाबाद भागीदारी

यशस्वी आऊट झाल्यानंतर उपकर्णधार ऋषभ पंत मैदानात आला. इथून पुढे कर्णधार गिल आणि उपकर्णधार पंत या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि नाबाद परतले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 199 चेंडूत 138 धावांची नाबाद भागीदारी केली. शुबमनने 175 चेंडूत 1 षटकार आणि 16 चौकारांसह नाबाद 127 धावा केल्या. तर पंतने 102 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह नॉट आऊट 65 रन्स केल्या. तर इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स याने 2 विकेट्स मिळवल्या. तर बार्यडन कार्सने 1 विकेट मिळवली.

पहिला दिवस भारताचा

सत्रनिहाय धावा

पहिलं सत्र, 25.4 ओव्हर, 92 रन्स आणि 2 विकेट्स

दुसरं सत्र : 25.2 ओव्हर, 123 रन्स

तिसरं सत्र : 34 षटकं, 144 धावा आणि 1 विकेट