ENG vs NZ, 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, तब्बल 4 बदल, दोघांचं पदार्पण
England Playing 11 Against New Zealand For 2nd Test : इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याआधी इंग्लंडने आपल्या 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. जाणून घ्या

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडने या विजयासह मालिका विजयाचा दावा मजबूत केलाय. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्ण संधी आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा 17 जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये होणार आहे. या सामन्याच्या 48 तासांआधीच इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे.
जो रुट याच्याकडे नेतृत्वाची धुरा
इंग्लंडकडून न्यूझीलंड विरुद्ध दोघांचं पदार्पण होणार आहे. जॉर्डन कॉक्स आणि सोनी बेकर या दोघांचं कसोटी पदार्पण होणार आहे. तसेच नाईट क्लब वादानंतर गसन एटकीन्सन आणि नियमित कर्णधार बेन स्टोक्स या दोघांना दुसऱ्या कसोटीतून बाहेर करण्यात आलं आहे. त्यामुळे अनुभवी फलंदाज जो रुट हा दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेन स्टोक्स आणि गस एटकीन्सन हे दोघे इंग्लंडच्या मालिकेतील पहिल्या विजयानंतर जल्लोष करण्यासाठी गेले होते. तिथे या दोघांच्या अंगरक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात सध्या तपास सुरु आहे. त्यामुळे तपासापर्यंत स्टोक्स आणि एटकीन्सन या दोघांना टीमपासून दूर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा समावेश करण्यात आला आहे. तर रॉबिन्सन याला दुखापतीमुळे दुसर्या कसोटीतून बाहेर व्हावं लागलंय. मात्र जोफ्राच्या कमबॅकमुळे इंग्लंडच्या बॉलिंगला बुस्टर मिळाला आहे.
इंग्लंड 4 वेगवान गोलंदाजांसह खेळणार
फिरकीपटू शोएब बशीर याला बाहेर ठेवण्यात आलं आहे. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. या चौघांमध्ये मॅथ्यू फिशर याचा समावेश आहे. मॅथ्यूचा हा दुसरा कसोटी सामना असणार आहे.
इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण?
Four changes to our XI, with Test debuts for Jordan Cox and Sonny Baker 😍👇
— England Cricket (@englandcricket) June 15, 2026
स्टोक्सच्या जागी कुणाला संधी?
दरम्यान बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत जो रुट नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र स्टोक्सच्या जागी कुणाला संधी दिलीय? हा प्रश्न चाहत्यांना पडलाय. स्टोक्सच्या जागी सातव्या स्थानी जॉर्डन कॉक्स खेळणार आहे.
न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, जेमी स्मिथ (विकेटकीपर) आणि जोश टंग.