Jason roy च्या तुफानी शतकानंतर इंग्लंडचा डाव गडगडला, 125 रन्समध्ये 10 विकेट

| Updated on: Jan 28, 2023 | 11:27 AM

इंग्लंडची टीम मोठा विजय मिळवणार असं वाटत होतं. पण 20 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकन बॉलर्सनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजीच कंबरड मोडलं.

Jason roy च्या तुफानी शतकानंतर इंग्लंडचा डाव गडगडला, 125 रन्समध्ये 10 विकेट
jason-roy
Follow us on

डरबन – दक्षिण आफ्रिकेने इंग्लिश ओपनर जेसन रॉयच्या तुफानी शतकावर पाणी फिरवलं. पहिल्या वनडेमध्ये जेसन रॉयने धमाकेदार बॅटिंग केली. इंग्लंडची टीम मोठा विजय मिळवणार असं वाटत होतं. पण 20 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकन बॉलर्सनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजीच कंबरड मोडलं. दक्षिण आफ्रिकेने पहिली बॅटिंग केली. रासी वॅन डर डुसैच्या 111 धावांच्या बळावर 7 विकेट गमावून 298 धावा केल्या.

146 धावांची भागीदारी

लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लिश टीमकडून जेसन रॉय आणि डेविल मलानने जोरदार सुरुवात दिली. दोघांनी 146 धावांची भागीदारी केली. 19.2 ओव्हरमध्ये इंग्लंडने एकही विकेट गमावला नव्हता.

दक्षिण आफ्रिकेची टीम बॅकफूटवर होती

या मजबूत पार्ट्नरशिपमुळे दक्षिण आफ्रिकेची टीम बॅकफूटवर होती. त्यांचा पराभव होणार हे दिसत होतं. सिसांदा मगालाने 20 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मलानला 59 रन्सवर आऊट करुन ही शतकी भागीदारी मोडीत काढली.

दक्षिण आफ्रिकेकडून कोणी विकेट काढल्या?

मलान आणि रॉयची भागीदारी तुटताच इंग्लंडचा डाव गडगडला. त्यानंतर संपूर्ण टीमने मिळून फक्त 125 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 125 रन्समध्ये इंग्लंडच्या 10 विकेट काढल्या. एकवेळी इंग्लंडची स्थिती 146/0 होती. ती टीम पूर्ण 50 ओव्हर सुद्धा खेळू शकला नाही. 44.2 ओव्हरमध्ये इंग्लंडची टीम 271 रन्सवर ऑलआऊट झाली.

दक्षिण आफ्रिकेकडून एनरिख नॉर्खियाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याशिवाय सिसांदाने 4, कागिसो रबाडाने 2 आणि तबरेज शम्सीने एक विकेट घेतली. जेसन रॉयने त्याच्या 113 धावाच्या इनिंगमध्ये 11 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्याने आपलं 11 वी सेंच्युरी 79 चेंडूत पूर्ण केली.