ENG vs SL: कॅप्टन धनंजया डी सिल्वा-मिलन रथनायेकेची अर्धशतकी खेळी, श्रीलंकेच्या पहिल्या डावात 236 धावा

England vs Sri Lanka 1st Test: श्रीलंका क्रिकेट टीमचा पहिला डाव 236 धावांवर आटोपला आहे. मिलन रथनायके आणि धनंजया डी सिल्वा या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या.

ENG vs SL: कॅप्टन धनंजया डी सिल्वा-मिलन रथनायेकेची अर्धशतकी खेळी, श्रीलंकेच्या पहिल्या डावात 236 धावा
Dhananjaya de Silva and milan rathnayake
| Updated on: Aug 21, 2024 | 10:38 PM

श्रीलंका क्रिकेट टीमचा इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिला डाव हा पहिल्याच दिवशी आटोपला आहे. श्रीलंकेने 74 ओव्हरमध्ये ऑलआऊट 236 धावा केल्या. श्रीलंकेसाठी कॅप्टन धनंजया डी सिल्वा आणि डेब्यूटंट मिलन रथनायके या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. दोघांनी 70 पेक्षा अधिक धावा केल्या. सलामी जोडी सपशेल अपयशी ठरली. त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर अनुभवी अँजलो मॅथ्यूज याला खातंही उघडता आलं नाही. तर इतरांना ठिकठाक सुरुवात मिळाली, मात्र त्यांना त्याचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही. इंग्लंडसाठी ख्रिस वोक्स आणि शोएब बशीर या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेची अत्यंत निराशाजनक सुरुवात झाली. श्रीलंकेने पहिल्या तिन्ही विकेट्स या 6 धावांवर गमावल्या. निशान मधुशंका 4, करुणारत्ने 2 आणि अँजलो मॅथ्यूज भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर कुसल मेंडीसने 24 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. दिनेश चांडीमल याने 17 धावांचं योगदान दिलं. कामिंदू मेंडीसने 12 धावा जोडल्या. प्रबाथ जयसूर्याने 10 धावांची भर घातली. त्यानंतर कॅप्टन धनंजय डी सिल्वा आणि मिलन रथनायके या दोघांनी आठव्या विकेटसाठी 98 बॉलमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप केली. तर नवव्या विकेटसाठी मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो या जोडीने 50 धावांची भागीदारी केली.

इंग्लंडसाठी ख्रिस वोक्स याने 11 ओव्हरमध्ये 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. वोक्सने 3 मेडन ओव्हर टाकल्या. शोएहब बशीर याने 7 पैकी 2 षटकं निर्धाव टाकल्या. त्याने 18 धावांच्या मोबदल्यात तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर गस ऍटकिन्सन याने 2 विकेट्स मिळवल्या. मार्क वूड याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

श्रीलंकेच्या पहिल्या डावात 236 धावा

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.