AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs WI: जेम्स अँडरसन अखेरच्या सामन्यानंतर भावूक, व्हीडिओ व्हायरल

James Anderson Emotional: इंग्लंडने वेस्ट इंडिजवर पहिल्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून जेम्स अँडरसनला निरोप दिला. अँडरसन आपल्या अखेरच्या सामन्यानंतर भावूक झाला.

ENG vs WI: जेम्स अँडरसन अखेरच्या सामन्यानंतर भावूक, व्हीडिओ व्हायरल
James Anderson Emotional
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 12, 2024 | 6:38 PM
Share

यजमान इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजवर 1 डाव आणि 114 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पदार्पणवीर गस ऍटकिन्सन हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. गसने दोन्ही डावात मिळून एकूण 12 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने यासह दिग्गज गोलंदाज 41 वर्षीय जेम्स अँडरसन याला विजयी निरोप दिला. जेम्सने विंडिज विरुद्धचा पहिला कसोटी सामन्यानंतर निवृ्त्त होणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. इंग्लंडच्या विजयानंतर जेम्सला भावूक झालेला दिसून आला. त्यानंतर सहकाऱ्यांनी जेम्सला सावरलं. जेम्सचा भावूक झाल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जेम्स अँडरसन भावूक

जेम्स अँडरसन आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना संपल्यानंतर भावूक झाला. अँडरसनने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 188 सामन्यांमध्ये 26.45 च्या सरासरीने 704 विकेट्स घेतल्या. अँडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 32 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच अँडरसनने 32 वेळा 4 विकेट्सही घेतल्या.

जिथे सुरुवात तिथेच शेवट

जेम्स अँडरसन याने 2003 साली झिंबाब्वे विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. हा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आला होता. तर जेम्सने अखेरचा सामना ही इथेच खेळला. जेम्सने अशाप्रकारे जिथून कसोटी क्रिकेटची सुरुवात केली तिथेच त्याने शेवट केला. जेम्सने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील 21 वर्षांमध्ये एकूण 991 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाजही ठरला आहे.

अँडरसनसाठी भावूक क्षण

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स

दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा मुथैय्या मुरलीथरन याच्या नावावर आहे. मुरलीथरन याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1 हजार 347 विकेट्स आहेत.

मुथैय्या मुरलीथरन : 1347 शेन वॉर्न :1001 जेम्स अँडरसन : 991 अनिल कुंबळे : 956 ग्लेन मॅग्राथ 949 वसीम अक्रम : 916

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता