Cricket : इंग्लंड-इंडिया टेस्ट सीरिजआधी टीमला मोठा झटका, ऑलराउंडर 5 सामन्यांतून आऊट

Injury : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी झालेल्या दुखापतीमुळे स्टार ऑलराउंडरला 5 सामन्यांना मुकावं लागणार आहे. कोण आहे तो?

Cricket : इंग्लंड-इंडिया टेस्ट सीरिजआधी टीमला मोठा झटका, ऑलराउंडर 5 सामन्यांतून आऊट
India vs England
Image Credit source: Bcci
| Updated on: May 31, 2025 | 6:18 PM

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघात एकूण 5 कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेआधी इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल कसोटी सामने खेळवण्यात येत आहेत. तर इंग्लंड टीम मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. इंग्लंडला या एकदिवसीय मालिकेदरम्यान मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा मॅचविनर ऑलराउंडर जेमी ओव्हरटन याला दुखापत झाली आहे. त्यामुळे ओव्हरटन याला विंडीज विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी 20i मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. तसेच ओव्हरटन टीम इंडिया विरूद्धच्या टेस्ट सीरिजमधील निवडीसाठी उपलब्ध असणार की नाही? याबाबतही अनिश्चितता आहे.

जेमी ओव्हरटन याला उजव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे जेमीला विंडिज विरूद्धच्या उर्वरित 2 एकदिवसीय सामन्यांना आणि 3 टी 20i मॅचच्या सीरिजला मुकावं लागणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात 29 मे रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. जेमीला या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. इंग्लंडने हा सामना 238 धावांच्या ऐतिहासिक फरकाने जिंकला होता. जेमीने या सामन्यात 5.2 ओव्हरमध्ये 22 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या. जेमीला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागी दुसर्‍या सामन्यासाठी मॅथ्यू पॉट्स याचा समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडला मोठा झटका

इंग्लंड-विंडीज एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 29 मे, बर्मिंगघम

दुसरा सामना, 1 जून, कार्डीफ

तिसरा सामना, 3 जून, लंडन

टी 20I मालिका

पहिला सामना 6 जून, रिव्हरसाईड ग्राउंड

दुसरा सामना, 8 जून, काउंटी ग्राउंड, ब्रिस्टॉल

तिसरा सामना, 10 जून, साउथ्मप्टन

जेमी ओव्हरटन याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

जेमी ओव्हरटन याने गेल्या वर्षी 2024 साली एकदिवसीय पदार्पण केलं होतं. ओव्हरटन याने तेव्हापासून आतापर्यंत एकूण 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. ओव्हरटनने या 6 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. तर 12 टी 20i सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जेमीने 2022 साली न्यूझीलंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र तेव्हापासून त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता ओव्हरटन टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील निवडीसाठी उपलब्ध असणार की नाही? याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.