AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs PAK Test: साडे पाच तासात पाकिस्तानचा खेळ खल्लास, इंग्लंडने असा जिंकला सामना

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामना अडीच दिवसात पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा अडीच दिवसात खेळ संपवला. यासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

ENG vs PAK Test: साडे पाच तासात पाकिस्तानचा खेळ खल्लास, इंग्लंडने असा जिंकला सामना
ENG vs PAK Test: साडे पाच तासात पाकिस्तानचा खेळ खल्लास, इंग्लंडने असा जिंकला सामनाImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Aug 21, 2026 | 8:33 PM
Share

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानची दाणादण उडवून दिली. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपत नाही तर पाकिस्तानचा संघ 171 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 409 धावा केल्या. यासह पहिल्या डावात 238 धावांची आघाडी घेतली. या धावांची आघाडी मोडून काढताना पाकिस्तान संघाची दाणादाण उडाली. अवघ्या 135 धावांवर सर्व संघ बाद झाला. यासह इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 103 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने पुन्हा एकदा कसोटी संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे.

इंग्लंडने साडे पाच तासात खेळ संपवला!

इंग्लंडने पाकिस्तानला साडे पाच तासात नमवलं. पहिल्या डावात 171 धावा केल्या. हा खेळ सुमारे 3 तास 15 मिनिटे चालला. यात पाकिस्तानने एकूण 48.1 षटकं खेळली. तर दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ 2 तास 15 मिनिटे चालला. या डावात पाकिस्तानने 37.3 षटकं खेळली आणि सर्व गडी गमावले. दोन्ही डाव मिळून पाकिस्तानने एकूण साडे पाच तास फलंदाजी केली. यात पाकिस्तानने 85 षटकं खेळली. सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडच्या गोलंदाजाने पाकिस्तानच्या सलामीवीराला बाद करून सामन्यावर आपला दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर पाकिस्तानची स्थिती नाजूक होत गेली.

इंग्लंडच्या गोलंदाजांची कमाल

इंग्लंडकडून पहिल्या डावात ओली रॉबिनसन आणि जोश टंग यांनी पाकिस्तानला रोखलं होतं. ओली रॉबिनसनने 18 षटकात 51 धावा देऊन 5 गडी, तर जोश टंगने 9.1 षटकात 46 धावा देत 5 गडी तंबूत धाडले होते. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून ओली रॉबिनसन आणि जोश टंग यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर जोफ्रा आर्चरने 3 आणि गस एटकिनसनने 1 गडी बाद केला.

या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 ऑगस्टपासून ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. हा सामना निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला तर मालिकाही हातून जाईल. सध्या पाकिस्तानचा खेळ पाहता क्लिन स्विप मिळेल अशीच स्थिती आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा