AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs PAK: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं, बॉलचे दोन तुकडे करून खेळाडूंना वाटले!

ENG vs PAK 1st Test: लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्याचा पहिला दिवस इंग्लंडने गाजवला. 171 धावांवर पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडलं. पण पहिल्या डावाचा खेळ संपला तेव्हा विचित्र प्रकार पाहायला मिळाला. चेंडू मधून कापून खेळाडूंना वाटला गेला.

ENG vs PAK: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं, बॉलचे दोन तुकडे करून खेळाडूंना वाटले!
ENG vs PAK: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं, बॉलचे दोन तुकडे करून खेळाडूंना वाटले!Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Aug 20, 2026 | 4:43 PM
Share

इंग्लंड पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ओली रॉबिनसह आणि जोश टंग यांनी पाकिस्तान फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 171 धावांवर बाद झाला. पण पाकिस्तानचा डाव संपल्यानंतर लगेचच चेंडू दोन भागात कापला गेला. त्याचा एक भाग ओली रॉबिनसनला दिला गेला. तर दुसरा भाग जोश टंगला दिला. असं करण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चेंडू मध्यभागी कापण्याची काय गरज होती? नेमकं काय घडलं? असे एक ना अनेक प्रश्न क्रीडाप्रेंमींच्या डोक्यात फिरत होते. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.

चेंडू मधून कापण्याचं कारण की…

क्रिकेटमधील प्रथेनुसार, पाच विकेट घेतल्यानंतर गोलंदाज चेंडू आपल्यासोबत मैदानाबाहेर घेऊन जातो आणि त्याच्याकडेच ठेवतो. हेडिंग्ले कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी मात्र दोन गोलंदाजांनी अशी कामगिरी केली. ओली रॉबिनसन आणि जोश टंग यांनी प्रत्येकी 5 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. ओली रॉबिनसनने 18 षटकं टाकली, त्यापैकी 3 निर्धाव राहिली. तर 51 धावा देऊन 5 विकेट काढल्या. दुसरीकडे, जोश टंगने 9.1 षटकात 46 धावा देत 5 विकेट नावावर केल्या. दोघांच्या नावावर पाच विकेट असल्याने चेंडू घेऊन कोण जाणार? हा प्रश्न होता. मग काय चेंडू दोन भागात कापला गेला. एक भाग रॉबिनसनला आणि दुसरा भाग जोशला दिला गेला.

काय म्हणाला जोश टंग?

जोश टंगने या प्रकारानंतर सांगितलं की, ओली रोबिनसन म्हणाला की आपण चेंडू दोन भागात वाटून घेऊयात. त्यानंतर ग्राउंड स्टाफने चेंडू दोन भागात बरोबर कापला. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला. आता अर्धा तुकडा मी माझ्याजवळ ठेवणार आहे. हे खूपच नवीन काहीतरी होतं आणि मी कधीच विसरणार नाही.

इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 20 वर्षानंतर एका डावात 5-5 विकेट घेण्याचा कारनामा दोन गोलंदाजांनी केला आहे. विशेष म्हणजे 2006 साली झालेला सामनाही पाकिस्तानविरुद्ध होता. तेव्हा स्टीव्ह हार्मिसन आणि माँटी पनेसरने प्रत्येकी 5 विकेट घेतल्या होत्या. पण तेव्हा चेंडू काही दोन भागात कापण्याचा प्रकार घडला नव्हता.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ