ICC | टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूसाठी वाईट बातमी, आयसीसीचा मोठा निर्णय

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत 2-1 ने मालिका विजय मिळवला. मात्र आयसीसीच्या त्या एका निर्णयाने टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आसीसीने ट्विट करत...

ICC | टीम इंडियाच्या या खेळाडूसाठी वाईट बातमी, आयसीसीचा मोठा निर्णय
| Updated on: Mar 13, 2023 | 7:32 PM

अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला.त्यामुळे टीम इंडियाने ही टेस्ट सीरिज 2-1 च्या फरकाने जिंकली. टीम इंडियाचा मायदेशातील सलग 16 वा मालिका विजय ठरला. तसेच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सलग चौथ्यांदा 2-1 अशा फरकाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियावर मात केली. या मालिकेत टीम इंडियाच्या आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या जोडीने शानदार कामगिरी केली या. दोघांनी या मालिकेत 25 आणि 22 विकेट्स घेतल्या. यासाठी दोघांना संयुक्तरित्या मालिकावीर ठरवण्यात आले.

विशेष म्हणजे न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा 2 विकेट्सने पराभव केल्याने टीम इंडियाने wtc final मध्ये धडक मारली. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मात्र या आनंदावर आयसीसीने विरजण टाकलं आहे. आयसीसीच्या एका निर्णयामुळे टीम इंडियाच्या रविंद्र जडेजा याला मोठा झटका लागला आहे. आयसीसीने या निर्णयाबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

नक्की काय झालं?

आयसीसीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रूक हा फेब्रुवारी ‘प्लेअर ऑफ द मन्थ’ ठरला आहे. या पुरस्कारासाठी हॅरी ब्रूक याच्यासह रविंद्र जडेजा आणि विंडिजकडून स्पिनर गुडाकेश मोती या तिघांना नामांकन मिळालं होतं. मात्र हॅरीने या दोघांना मागे टाकत बाजी मारली आहे. जर हा पुरस्कार जडेजा याला मिळाला असता, तर त्याचा आणि पर्यायाने टीम इंडियाचा आणि चाहत्यांचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला असता. मात्र तसं झालं नाही.

हॅरी ब्रूक फेब्रुवारी प्लेअरलऑफ द मन्थ

आयसीसीच्या या पुरस्काराबाबत थोडक्यात

आयसीसी दर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी 3 जणांना नामांकन देतं. त्यानंतर क्रिकेट चाहता आपल्या आवडत्या खेळाडूला आयसीसीच्या वेबसाईटवर जाऊन व्होट करुन शकतो. खेळाडूला मिळालेले व्होट आणि त्याची कामगिरी यानुसार आयसीसी तिघांपैकी सर्वोत्तम खेळाडू ठरवतं आणि त्यानंतर त्याच्या नावाची घोषणा करते.

दरम्यान आता या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 17 मार्चपासून सुरु होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात हार्दिक पंड्या नेतृत्व करणार आहे. तर त्यानंतर उर्वरित मालिकेत रोहित शर्मा कॅप्टन्सी करणार आहे.