बलाढ्य ऑस्‍ट्रेलियाचा संघ अवघ्या 65 धावांवर सर्वबाद, ‘या’ खेळाडूच्या नावावर बनला होता जबरदस्‍त वर्ल्‍ड रेकॉर्ड

| Updated on: Aug 13, 2021 | 6:15 PM

जागतिक क्रिकेटमध्ये पूर्वीपासून एक बलाढ्य संघ असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा एक डाव अवघ्या 65 धावांवर रोखणाऱ्या या अवलियाचा आज वाढदिवस आहे.

बलाढ्य ऑस्‍ट्रेलियाचा संघ अवघ्या 65 धावांवर सर्वबाद, या खेळाडूच्या नावावर बनला होता जबरदस्‍त वर्ल्‍ड रेकॉर्ड
Follow us on

लंडन : जागतिक क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघापैकी एक म्हटलं तर ऑस्ट्रेलिया हे नाव आपोआपच आपल्या डोळ्यासमोर येतं. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे जो अगदी पूर्वीपासून जागतिक क्रिकेटमधील टॉपचा संघ आहे. पण विचार करा याच ऑस्ट्रेलियाला अवघ्या 65 धावांवर सर्वबाद व्हाव लागलं तर…हो असं घडलं होत आणि ही धांसू कामगिरी करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या गोलंदाजाचा आज वाढदिवस आहे. हा खेळाडू म्हणजे  इंग्‍लंड क्रिकेट संघाचा (England Cricket Team) खेळाडू हॅरी डीन (Harry Dean). हॅरीचा आज वाढदिवस असून 1884 मध्ये 13 ऑगस्टरोजी हॅरी जन्माला आला होता.

इंग्‍लंडकडून केवळ तीन कसोटी सामने खेळणाऱ्या हॅरी शेवटच्या दोन सामन्यातील कामगिरीमुळे कायम सर्वांच्या स्मरणात आहे. यातील एक म्हणजे द ओवल मैदानात ऑस्‍ट्रेलिया संघाविरुद्ध त्याने ऐतिहासिक प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला होता. सामन्यात त्याने केवळ 19 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट मिळवले होते. ज्यामुळे ऑस्‍ट्रेलियाचा तगडा संघ अवघ्या 65 धावांवर सर्वबाद झाला होता. याशिवाय हॅरीने 1913 मध्ये लंकाशरमध्ये खेळताना यॉर्कशर संघाविरुद्ध एका सामन्यातील दोन डावांत 91 धावा देत तब्बल 17 विकेट्स मिळवल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचं सर्वात बेस्ट प्रदर्शन आहे.

267 सामने 1301 विकेट्स

इंग्‍लंड संघासाठी आंतरराष्‍ट्रीय स्तरावर हॅरी केवळ तीनच टेस्‍ट सामने खेळला. 11 विकेट्स मिळवले. पण यात एका निर्णायक सामन्यात 19 धावा देत चार विकेट्स घेणे हे त्याचे बेस्ट प्रदर्शन ठरले. हॅरीने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत मात्र अप्रतिम कामगिरी केली. 267 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 1 हजार 301 गडी बाद केले. एका डावात 31 रन देत 9 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वश्रेष्‍ठ प्रदर्शन ठरलं.

हे ही वाचा

आधी दमदार फलंदाजी, मग भेदक गोलंदाजी, इंग्लंडमध्ये ‘या’ खेळाडूने 5 चेंडूत घेतले 4 विकेट

इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेतला तीन दिग्गजांनी संन्यास, भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षकाचा समावेश