IND v ENG: इंग्लंडच्या 39 वर्षीय गोलंदाजाची कमाल, भारताविरुद्ध केला नवा विक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. भारतीय फलंदाजानी उत्तम सुरुवात केली असली तरी इंग्लंडच्या गोलंदाजानी देखील गोलंदाजीत एक चुनुक कायम ठेवली आहे.

IND v ENG: इंग्लंडच्या 39 वर्षीय गोलंदाजाची कमाल, भारताविरुद्ध केला नवा विक्रम
जेम्स अँडरसन

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) उत्कृष्ट गोलंदाजीचे दर्शन घडवत आहे. 39 वर्षाच्या वयातही त्याची गोलंदाजी अप्रतिम दर्जाची आहे. दुसऱ्या कसोटीत सुरुवातीच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेत जेम्सने त्याच्या संघाला काहीसा दिलासा मिळवून दिला आहे. सोबतच त्याने भारताविरुद्ध एक नवा रेकॉर्डही केला आहे. जेम्सने भारताविरुद्ध एकाच मैदानात सर्वाधिर टेस्ट विकेट घेण्याचा रिकॉर्ड केला आहे. त्याने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात भारताविरुद्ध 30 विकेट पूर्ण करत श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलीथरनचा रेकॉर्ड मागे टाकला आहे. मुरलीने कोलंबोच्या एसएससी मैदानात भारताविरुद्ध 29 विकेट्स घेतले होते.

जेम्स हा कसोटी क्रिकेट इतिहासातील एक महान गोलंदाज असून त्याने तब्बल 35000 हून अधिक चेंडू फेकले आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज आणि चौथा गोलंदाज बनला आहे. त्याच्या आधी तीन फिरकीपटूंनी अशी कामगिरी केली आहे. यामध्ये श्रीलंकेचा मुथ्थया मुरलीथरन (44,039 चेंडू), भारताचा अनिल कुंबळे (40,850 चेंडू) आणि ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने (40,705चेंडू) फेकले आहेत. तर वेगवान गोलंदाजा विचार करता जेम्सनंतर वेस्ट इंडीजच्या कर्टनी वाल्शने (30,019 चेंडू), इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने (29,863 चेंडू) आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राथने (29,248 चेंडू) फेकले आहेत.

अँडरसनने तोडलं रोहितचं स्वप्न

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारकाला इउत्तम सुरुवात करुन देणारा रोहित शर्मा आपलं शतक पूर्ण करेल असं साऱ्यानांच वाटत होतं. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात शतक पूर्ण करुन रोहित इतिहास रचण्यापासून अवघ्या 17 धावा दूर होता. पण त्याच क्षणी जेम्स अँडरसनने एक अप्रतिम चेंडू फेकत रोहितला त्रिफळाचित केलं. ज्यामुळे रोहितचं परदेशात आणि लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात शतक लगावण्याचं स्वप्न अपुरं राहिलं. रोहित पाठोपाठ जेम्सने लगेचच चेतेश्वर पुजाराची शिकार केली. पुजारा 23 चेंडूत 9 धावा करुन सेट होत असतानाच जेम्सने त्याला बाद करत इंग्लंडला दुसरं यश मिळवून दिलं.

हे ही वाचा

IND v ENG: खराब फॉर्ममुळे दोन वर्ष संघाबाहेर राहिलेल्या राहुलने रचला इतिहास, सुवर्ण अक्षरात कोरलं जाणार नाव

IND v ENG: ‘या’ कारणामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्विनला संधी नाही, विराटने स्वत: केला खुलासा

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

(James anderson became first bowler to take most wicket agaisnt india at same venue)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI