IND v ENG: ‘या’ भारतीय फलंदाजाचं भविष्य धोक्यात, मागील 10 डावांत 25 हूनही कमी धावा

या भारतीय फलंदाजाने शेवटचं शतक जानेवारी, 2019 मध्ये ठोकलं होतं. तेव्हापासून तो शतकाच्या प्रतिक्षेत असून मागील काही डावांतील त्याच प्रदर्शन अत्यंत खराब आहे.

IND v ENG: 'या' भारतीय फलंदाजाचं भविष्य धोक्यात, मागील 10 डावांत 25 हूनही कमी धावा
चेतेश्वर पुजारा
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 11:19 AM

IND vs ENG : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र भारताने दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर रोहित शर्माचं अर्धशतक आणि केएलराहुलच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्यादिवसाखेर 276 धावापर्यंत मजल मारली आहे. पण बाद झालेल्यांमध्ये विराटने देखील 42 धावा करत योगदान दिले. मात्र फलंदाज चेतेश्वर पुजाराचे खराब प्रदर्शन अजूनही सुरुच असल्याने त्याच संघातील भविष्य धोक्यात आलं आहे. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात 4 धावांवर बाद झालेला पुजारा या कसोटीतही 23 चेंडूत 9 धावा करुन बाद झाला आहे.

राहुल द्रविडनंतर भारतीय संघाची ‘द वॉल’ अशी पदवी मिळालेल्या पुजाराला मागील काही डावात काहीच खास कामगिरी करता आलेली नाही. ज्यामुळे त्याच्यावरील दबाव वाढत आहे. त्याच्यामुळे भारताची मधली फळी अयशस्वी होत असून सलामीवीर आणि शेवटच्या फळीतील फलंदाजावर याचा ताण येत आहे. पुजाराने  जानेवारी, 2019 मध्ये शेवटचं शतक लगावलं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी टेस्टमध्ये त्याने 193 धावांची खेळी केली होती. 2020 नंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या पुजाराने 23 डावांत केवळ 552 धावा केल्या असून त्याची सरासरी 25 आहे. 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने काही चांगली अर्धशतकं झळकावली होती. मात्र त्यानंतर मागील 10 डावांत 25 चा आकडाही तो पार करु शकलेला नाही. मागील 10 डावांत त्याचा सर्वोच्च स्कोर 21 असून इंग्लंड दौऱ्यात तर त्याने 8, 15, 4, नाबाद 12 आणि 9 अशी धावसंख्या केली आहे.

भारतातही पुजाराची नौका संकटात

पुजाराचा खराब फॉर्म हा फक्त परदेशातील मैदानांपुरता मर्यादीत नसून भारतीय मातीतही त्याला खास कामगिरी करत येत नाहीये. याच वर्षी भारतात पार पडलेल्या जानेवारी-फेब्रुवारीमधील इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 73 धावा केल्या. पण त्यानंतर मात्र त्याला एकाही डावात चांगली धावसंख्या उभी करता आली नाही. 15, 21,7,0, आणि 17 अशी धावसंख्या केल्याने पुजारा भारतीय मैदानातही फॉर्ममध्ये नसल्याचं समोर आलं आहे. त्याच्या या सर्व खराब प्रदर्शनामुळे त्याच संघातील स्थान धोक्यात आलं आहे.

हे ही वाचा

IND v ENG: खराब फॉर्ममुळे दोन वर्ष संघाबाहेर राहिलेल्या राहुलने रचला इतिहास, सुवर्ण अक्षरात कोरलं जाणार नाव

IND v ENG: ‘या’ कारणामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्विनला संधी नाही, विराटने स्वत: केला खुलासा

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

(Indian Batter cheteshwar pujaras position in Team india is in danger)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.