IND v ENG: ‘या’ कारणामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्विनला संधी नाही, विराटने स्वत: केला खुलासा

नॉटिंघममधील पहिल्या टेस्टमध्ये संधी न मिळालेल्या आर आश्विनला लॉर्ड्स कसोटीत खेळवतील अशी आशा होती. पण यावेळीही आश्विनला संधी मिळालेली नाही.

IND v ENG: 'या' कारणामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्विनला संधी नाही, विराटने स्वत: केला खुलासा
आर. आश्विन
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 7:04 PM

लंडन : इंग्लंड (England) विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्स मैदानावर रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) अंतिम 11 मध्ये संधी मिळणार अशी चर्चा होती. शार्दूल ठाकूर (Shardul Tahkur) दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्याजागी अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी आश्विनला संधी दिली जाईल असे वाटत असतानाच त्याजागी अनुभवी गोलंदाज इशांत शर्माला (Ishant Sharma) संघात स्थान मिळालं. दरम्यान अंतिम क्षणी बदललेल्या या निर्णयाबद्दल विराटने खुलासा केला आहे.

कोहलीने टॉस दरम्यान 12 खेळाडू अंतिम निवडले होते. ज्यामध्ये आश्विनही होता. पण सामना सुरु होताच इशांतला संघात स्थान देत आश्विनला संघाबाहेर ठेवलं. या निर्णयावर विराट म्हणाला,“मी 12 खेळाडू फायनल केले होते.  ज्यात आश्विनही होता. पण टॉसनंतर मैदानाची आजची स्थिती पाहिली असता चौथा गोलंदाज वेगवान गोलंदाजच असावा अशी रणनीती बनवल्याने आम्ही आश्विनच्या जागी इशांतला संधी दिली.”

‘भारतीय फलंदाजी मजबूत’

तसेच शार्दूलजाही एक अष्टपैलू पर्याय निवडण्याबाबत कोहली म्हणाला, ”शार्दुलच्या संघात नसल्याने भारतीय फलंदाजीवर अधिक फरक पडणार नाही. भारताकडे अगदी शेवटपर्यंत चांगले फलंदाज आहेत. त्यात मी, पुजारा आणि रहाणे यांनी आतापर्यंत खास योगदान न देताही आम्ही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आज आम्ही चांगली कामगिरी करुन भारताची फलंदाजी आणखी ताकदवर बनवू. त्यामुळे शार्दूलच्या जागी गोलंदाजीमध्ये अधिक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूची गरज भारतीय संघाला आहे.”

हे ही वाचा

IND vs ENG 2nd Test Day 1 Live: लंच ब्रेकनंतर सामन्याला पुन्हा सुरुवात, रोहित-राहुलची जोडी मैदानात, भारताची दमदार सुरुवात

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

(Virat Kohli tells the reason behind why R ashwin is not in playing 11 for 2nd india vs england test)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.