IND vs ENG 2nd Test Day 1 Live : पहिला दिवस भारताचा, लोकेश राहुलचं लॉर्ड्सवर शतक, दिवसअखेर 3 बाद 276 धावा

India vs England 2nd Test Day 1 Live Score: पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना समान गुण दिले असून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दुसरा सामना महत्त्वाचा आहे.

IND vs ENG 2nd Test Day 1 Live : पहिला दिवस भारताचा, लोकेश राहुलचं लॉर्ड्सवर शतक, दिवसअखेर 3 बाद 276 धावा
भारत विरुद्ध इंग्लंड

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. भारताला विजयासाठी केवळ 157 धावा हव्या असताना 9 विकेट्सही हातात होत्या. पण पावसामुळे अखेरच्या दिवशीचा खेळ झालाच नाही ज्यामुळे सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. त्यामुळे आजपासून लॉर्ड्समध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. इंग्लंडने टॉस जिंकत गोलंदाजी निवडली आहे. भारताकडून राहुल आणि शर्मा यांच्या जोडीने भारतासाठी बचावात्मक सुरुवात केली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI