Eng vs Ind VIDEO : पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहची धडाकेबाज सुरुवात, इंग्लंडचा सलामीवीर शून्यावर बाद

| Updated on: Aug 04, 2021 | 4:29 PM

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने झोकात सुरुवात केली आहे. नॉटिंगहम कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला भारताच्या जसप्रीत बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला.

Eng vs Ind VIDEO :  पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहची धडाकेबाज सुरुवात, इंग्लंडचा सलामीवीर शून्यावर बाद
Jasprit Bumrah wicket
Follow us on

England vs India लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने झोकात सुरुवात केली आहे. नॉटिंगहम कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला भारताच्या जसप्रीत बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. सलामीवीर रॉरी बर्न्सला एलबीडब्ल्यू बाद करुन, भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने विकेट घेतली. (England vs India first test Nottingham )

भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघात काही बदल करत के एल राहुल आणि शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले आहे. सोबतच रवींद्र जाडेजा एकमेव स्पिनर असून आश्विन ऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.

भारताकडून सलामीला कोण

भारतीय संघातील खेळाडू सतत दुखापतग्रस्त होत असल्याने संघ प्रशासनाला अंतिम 11 खेळाडू निवडणे कठीण झाले होते. नुकताच संघाचा सलामीवीर मयांक अगरवाल (Mayank Agarwal) दुखापतग्रस्त झाल्याने नवा सलामीवीर कोण असेल याबाबत उत्सुकता होती. यासाठीच भारताकडून दोन वर्षापूर्वी अखेरचा कसोटी सामना खेळलेल्या केएल राहुलचे (KL Rahul) नाव निश्चित करण्यात आले होते. रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून राहुलला पाठवण्यात येईल.  के एल राहुलने नुकतीच काउंटी 11 संघासोबत झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यातही शतक ठोकले होते.

भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

इंग्लंड संघ – आर. बर्न्स, डी. सिबले, क्रॉली, जो रुट, जॉनी बेयरस्टो, डी. लॉरेन्स, जॉस बटलर, सॅम करन, ओ. रॉबिनसन, स्टुवर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन