IND vs ENG, Lord’s Test: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ‘हे’ दोन बदल, अशी असेल विराटसेना

| Updated on: Aug 11, 2021 | 2:03 PM

भारताच्या हातातील पहिला कसोटी सामना पावसाने हिरावून घेतल्याने दुसऱ्या सामन्यात मात्र काहीही करुन विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. संघात दोन बदल होण्याची दाट शक्यता आहे.

IND vs ENG, Lord’s Test: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात हे दोन बदल, अशी असेल विराटसेना
भारतीय संघ
Follow us on

लंडन : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघावर वरुणराजाची कृपा झाली आणि संघ पराभवापासून थोडक्यात बचावला. भारताला विजयासाठी केवळ 157 धावा हव्या असताना 9 विकेट्सही हातात होत्या. पण पावसामुळे अखेरच्या दिवशीचा खेळ झालाच नाही ज्यामुळे सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. त्यामुळे लॉर्ड्समध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत मात्र भारत विजय मिळवण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहे. यासाठी भारतीय संघा काही बदल देखील होऊ शकतात.

यामध्ये पहिला बदल म्हणजे अष्टपैलू शार्दुल ठाकुरच्या जागी आर आश्विनला खेळवले जाऊ शकते. तर दुसरा बदल म्हणून मोहम्मद सिराजच्या जागी अनुभवी इशांत शर्माला खेळवले जाऊ शकते. पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यात पहिला सामना अनिर्णीत राहिल्याने दोन्ही संघ सध्या बरोबरीत आहेत. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत.

शार्दुलसह सिराजला विश्रांती

शार्दुल ठाकुरच्या पायाला हॅमस्ट्रिंग इंजरी झाल्यामुळे त्याची ही दुखापत कधीपर्यंत ठिक होईल हे अद्याप माहित नसल्याने दुसऱ्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अष्टपैलू पर्याय म्हणून आर आश्विनला संधी देण्यात येईल. तसेच इशांत शर्मा याचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड चांगला असल्याने त्याला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यासाठी मोहम्मद सिराजला बाहेर ठेवले जाईल.

अतिरिक्त फलंदाजासह खेळू शकते टीम इंडिया

या दोन बदलांसह भारतीय संघात आणखी एक बदल केला जाऊ शकतो. त्यानुसार भारतीय संघात एक अतिरिक्त फलंदाज खेळवला जाऊ शकतो. मयांक अगरवाल आणि हनुमा विहारी यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. मयांक खेळल्यास राहुल सलामीवीराच्या जागी न उतरता मधल्या फळीत येईल.

दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य भारती संघ:

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा

हे ही वाचा

IND vs ENG: फिल्डींग कोच आर श्रीधर यांनी घेतली खेळाडूंची ‘शाळा’, अनोखा सराव, पाहा VIDEO

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

(For India vs England second test at lords r ashwin and ishant sharma may replace shardul thakur and siraj)