Cricket : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, 100 कसोटी खेळणाऱ्या माजी दिग्गज खेळाडूची अचानक एक्झिट

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचे वयाच्या 55 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून एका आजाराने तो ग्रासला होता त्यामध्येच त्याचे निधन झाले आहे.

Cricket : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, 100 कसोटी खेळणाऱ्या माजी दिग्गज खेळाडूची अचानक एक्झिट
Image Credit source: संग्रहित
| Updated on: Aug 05, 2024 | 5:42 PM

इंग्लंडचा महान फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचं निधन झालं आहे. 55 वर्षीय इंग्लिश क्रिकेटर अनेक दिवसांपासून आजारी होता. या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने आपला वाढदिवस साजरा केला. इंग्लंडकडून 100 कसोटी सामने खेळलेल्या ग्रॅहम थॉर्पने सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) थॉर्पनच्या निधनाबाबत माहिती दिली.

ग्रॅहम थॉर्पने निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंडच्या कोचिंग टीममध्येही होता. त्यासोबतच ग्रॅहमची 2022 मध्ये अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. एका आजाराने तो ग्रस्त होता, या आजाराशी झुंंज देत असतानाच त्याचे निधन झाले. क्रिकेट वर्तुळात त्याच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यात येत आहे. इंग्लंडकडून फक्त 17 खेळाडू आहे ज्यांनी 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. या यादीमध्ये ग्रॅहम थॉर्पचीही समावेश आहे.

 

इंग्लंड संघाकडून ग्रॅहम थॉर्प 1993 ते 2005 या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. ग्रॅहमने 100 कसोटी सामन्यातील 179 डावांमध्ये 16 शतके आणि 39 अर्धशतकांसह 44.66 च्या सरासरीने 6744 धावा केल्या. तर 77 एकदिवसीय सामने खेळले असून् त्यामध्ये त्याने 2380 धावा केल्या आहेत.