AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket News : 1999 चा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एका मोठ्या प्लेयरला भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाचा रोल

Cricket News : दक्षिण आफ्रिकेच्या या प्लेयरने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगने स्वत:ची दहशत निर्माण केली होती. 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये तर, त्याच्या बॅटमधून फोर, सिक्सचा पाऊस पडलेला. हाच प्लेयर आता भारतीय क्रिकेटमध्ये आलाय.

Cricket News : 1999 चा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एका मोठ्या प्लेयरला भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाचा रोल
South Africa Team
| Updated on: Jun 01, 2023 | 9:03 AM
Share

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा एक मोठा प्लेयर भारतीय क्रिकेटमध्ये भूमिका बजावताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या प्लेयरने जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची दहशत निर्माण केली होती. एककाळ त्याने गाजवला होता. खासकरुन 1999 च्या वर्ल्ड कपचा विषय निघाल्यावर त्याचं नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं. त्या वर्ल्ड कपमध्ये त्याने कमलीची बॅटिंग केली होती. दक्षिण आफ्रिकेचा हा ऑलराऊंडर प्लेयर भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या फिनिशरची आता भारतीय क्रिकेटमध्ये एंट्री झाली आहे. तो राज्यस्तरावरील क्रिकेटमध्ये सुधारणा घडवण्यासाठी काम करणार आहे.

भारतातील कुठल्या क्रिकेट असोशिएशनसाठी काम करणार?

दक्षिण आफ्रिकेच्या या माजी ऑलराऊंडरच नाव आहे लान्स क्लूजनर. त्रिपुरा क्रिकेट असोशिएशनने लान्स क्लूजनरला हेड ऑफ क्रिकेट ऑपरेशनच पद दिलय. त्रिपुरा क्रिकेटचे वाइस प्रेसिडंट तिमिर चंद्रा यांनी ही माहिती दिली. क्लूजनर शनिवारी त्रिपुरामध्ये दाखल होईल. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, लान्स क्लूजनर शनिवारीच आपला कार्यभार संभाळणार हे स्पष्ट आहे.

किती टीम्सची जबाबदारी?

त्रिपुरामध्ये क्रिकेटचा विकास ही लान्स क्लूजनरची जबाबदारी असेल. त्यांना राज्यातील पुरुष आणि महिला क्रिकेटपटू दोघांसोबत काम करायच आहे. 51 वर्षाच्या लान्स क्लूजनवर वेगवेगळ्या कॅटेगरीतील त्रिपुराच्या 8 टीम्सची जबाबदारी असणार आहे. यात रणजी संघ सुद्धा आहे. त्रिपुरामध्ये क्लूजनरचा पहिला फेज 20 दिवसांचा असेल. यात खेळाडूंना ओळखून त्यांना तो योग्य मार्गदर्शन करेल. टेस्ट, वनडेमध्ये कसा आहे परफॉर्मन्स?

लान्स क्लूजनर दक्षिण आफ्रिकेसाठी 49 टेस्ट आणि 171 वनडे सामने खेळलाय. टेस्टच्या 89 इनिंगमध्ये त्याने 4 सेंच्युरी आणि 8 हाफ सेंच्युरी झळकवल्या होत्या. त्याने टेस्टमध्ये 1906 धावा केल्या. वनडेमध्ये 2 सेंच्युरी आणि 9 हाफ सेंच्युरी झळकवताना त्याने 3576 धावा केल्या. क्लूजनरच्या नावावर टेस्टमध्ये 80 विकेट आणि वनडेमध्ये 192 विकेट आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर क्लूजनरची ओळख फिनिशर म्हणून होती. 1999 चा वर्ल्ड कप त्याने आपल्या बॅटने गाजवला होता. दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक सामने त्याने सहज फिनिश केले होते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.