AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs CSK : साई, शुबमन-जोसचा तडाखा, चेन्नईसमोर 230 रन्सचं टार्गेट, गुजरात जिंकणार?

Gujarat Titans vs Chennai Super Kings 1st Innings Highlights, IPL 2026 : गुजरात टायटन्सच्या टॉप ऑर्डरमधील 3 फलंदाजांनी सर्वाधिक योगदान देऊन चेन्नई विरुद्ध टीमला 229 रन्सपर्यंत पोहचवलं. त्यामुळे आता सामन्याचा निकाल काय लागतो? यासाठी आणखी 20 ओव्हरची प्रतिक्षा पाहावी लागणार आहे.

GT vs CSK : साई, शुबमन-जोसचा तडाखा, चेन्नईसमोर 230 रन्सचं टार्गेट, गुजरात जिंकणार?
Jos Buttler GT vs KKRImage Credit source: Bcci
| Updated on: May 21, 2026 | 10:44 PM
Share

गुजरात टायटन्सने  टॉप 3 फलंदाजांनी केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ससमोर 230 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने चेन्नई विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 66 व्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 229 रन्स केल्या. गुजरातसाठी कॅप्टन शुबमन गिल, ओपनर साई सुदर्शन आणि जोस बटलर या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे आता गुजरात सामना जिंकून टॉप 2 मध्ये कायम राखणार की चेन्नई विजय मिळवून प्लेऑफमधील आव्हान कायम राखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या डावात काय झालं?

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने टॉस जिंकून गुजरात टायटन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने या संधीचा पूर्ण फायदा घेत धमाका केला. कॅप्टन शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. साईने या दरम्यान सलग पाचवं अर्धशतक झळकावलं. सलामी जोडीने केलेल्या झंझावाती खेळीमुळे गुजरातला भक्कम सुरुवात मिळाली. या सुरुवातीचा तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेला अनुभवी फलंदाज जोस बटलर याने फायदा घेतला. जोसने नाबाद अर्धशतक झळकावून गुजरातला 220 पार पोहचवण्यात योगदान दिलं.

गुजरातची बॅटिंग

साई आणि शुबमन या दोघांनी 10 च्या रन रेटने शतकी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 12.2 ओव्हरमध्ये 125 रन्स केल्या. गुजरातने शुबमनच्या रुपात पहिली विकेट गमावली. शुबमनने 37 बॉलमध्ये 172.97 च्या स्ट्राईक रेटने 64 रन्स केल्या.

शुबमननंतर जोस बटलर या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 36 बॉलमध्ये 82 रन्स जोडल्या. त्यानंतर साई आऊट झाला. साईला शतकाची संधी होती. मात्र साईने शतकापेक्षा फटकेबाजीला प्राधान्य दिलं. साईने 53 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 7 फोरसह सर्वाधिक 84 रन्स केल्या. राहुल तेवतिया याला भोपळाही फोडता आला नाही. वॉशिंग्टन सुंदर याने 7 धावा जोडल्या. तर जोस नाबाद परतला. जोसने 27 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 57 रन्स केल्या. चेन्नईसाठी मुकेश चौधरी, स्पेन्सर जॉन्सन आणि अंशुल कंबोज या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

लाईव्ह स्कोअरकार्ड

चेन्नई गुजरातचा हिशोब करणार?

दरम्यान दोन्ही संघांची या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधीच्या सामन्यात गुजरातने चेन्नईवर मात केली होती. त्यामुळे चेन्नई हा सामना जिंकून प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासह गुजरातचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...