GT vs MI IPL 2023 Qualifier 2 | भल्याभल्यांच्या दांड्या उडवणाऱ्या मोहम्मद शमीचा तिलक वर्माने काढला घाम, एकाच ओव्हरमध्ये मजबूत फोडलं

GT vs MI IPL 2023 Qualifier 2 | अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात गुजरातने 234 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना तिलक वर्माने आक्रमक खेळी केली.

GT vs MI IPL 2023 Qualifier 2 | भल्याभल्यांच्या दांड्या उडवणाऱ्या मोहम्मद शमीचा तिलक वर्माने काढला घाम, एकाच ओव्हरमध्ये मजबूत फोडलं
पलटणनच्या तिलक वर्माचा नादच खुळा, पठ्ठ्याने शमीलाच बनवलं गिऱ्हाईक
| Updated on: May 26, 2023 | 11:10 PM

मुंबई : गुजरातने विजयासाठी दिलेलं 234 धावाचं मोठं आव्हान गाठताना मुंबईची सुरुवात अडखळत झाली. सलामीचा फलंदाज इशान किशन जखमी झाल्याने त्याच्या जागी नेहल वढेरा मैदानात उतरला. पण काही खास करू शकला. त्यानंतर कॅमरून ग्रीन जखमी झाल्याने रिटायर्ड हर्ट झाला. दुसरीकडे रोहित शर्माकडून अपेक्षा असताना काही खास करू शकला नाही. पण सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या मोहम्मद शमीला तिलक वर्माने चांगलाच धुतला. एका षटकात 24 धावा ठोकल्या.

तिलक वर्माने पहिल्या चार चेंडूवर मोहम्मद शमी सलग चार चौकार ठोकले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर दोन धावा काढल्या. तसेच शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला. त्यामुळे तिलक वर्माच्या आक्रमक खेळीमुळे फॅन्सना बरं वाटलं. त्याची आक्रमक खेळी पाहून शमीला देखील घाम फुटला.

तिलक वर्मा असाच खेळत राहीला तर विजय लांब जाईल, याची जाणीव हार्दिक पांड्याला होती. त्याने लगेचच आपल्या भात्यातील प्रमुख अस्त्र काढलं. हार्दिक पांड्याने षटक राशिद खानकडे सोपवलं. आक्रमकपणे खेळणाऱ्या तिलक वर्माचा राशिद खानने त्रिफळा उडवला. तिलक वर्माने 14 चेंडूत 43 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.