GT vs RR, IPL 2022: राजस्थान Playing XI च्या 7 खेळाडूंवर हा ‘गुजराती’ एकटा भारी पडू शकतो, रेकॉर्डचं आहे तसा

| Updated on: May 29, 2022 | 2:31 PM

GT vs RR, IPL 2022: दोन्ही संघाचे प्रत्येकी 11-11 खेळाडू या मॅचसाठी मैदानात उतरतील. पण राजस्थान रॉयल्सच्या 7 खेळाडूंवर गुजरात टायटन्सचा एक खेळाडू भारी पडू शकतो.

GT vs RR, IPL 2022: राजस्थान Playing XI च्या 7 खेळाडूंवर हा  गुजराती एकटा भारी पडू शकतो, रेकॉर्डचं आहे तसा
Rajasthan Royals
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: IPL 2022 ची फायनल राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे प्रत्येकी 11-11 खेळाडू या मॅचसाठी मैदानात उतरतील. पण राजस्थान रॉयल्सच्या 7 खेळाडूंवर गुजरात टायटन्सचा एक खेळाडू भारी पडू शकतो. त्या प्लेयरच नाव आहे, राशिद खान. राशिद खान (Rashid Khan) या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या दोन सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. तरीही राशिद खान राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात मोठा धोका आहे. राशिद खानला भले विकेट काढता आली नसेल, पण त्याने दबाव निर्माण करण्यात कुठलीही कमी ठेवली नाही. ज्याचा फायदा दुसऱ्या गोलंदाजांनी उचलला.

राशिद खानने दोन सामन्यात मिळून राजस्थान रॉयल्स विरुद्ध 8 षटकं गोलंदाजी केली. यात त्याने 39 धावा दिल्या. या दरम्यान राजस्थानने त्याच्या गोलंदाजीवर फक्त एक चौकार आणि एक षटकार खेचला. आर. अश्विन आणि जिमी नीशाम या दोघांनीच चौकार आणि षटकार मारले. म्हणजे मुख्य फलंदाजांपैकी कोणीच राशिद खानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला नाही.

राजस्थानच्या 7 प्लेयर्सवर तो एकटा भारी

राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग 11 च्या सात खेळाडूंचा राशिद खान विरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? ते जाणून घेऊया. यशस्वी जैस्वालने राशिद खानच्या 9 चेंडूंवर 13 धावा केल्या असून, तो एकदा आऊट झाला आहे. बटलरची स्थिती तर खूपच खराब आहे. त्याने राशिदच्या गोलंदाजीवर 41 चेंड़ूत 25 धावा केल्या. राशिदने त्याला 4 वेळा आऊट केलं. अजून पर्यंत त्याच्या गोलंदाजीवर बटलरने एकदाही चौकार मारलेला नाही.

हे सुद्धा वाचा

कॅप्टन संजू सॅमसनने राशिदच्या गोलंदाजीवर 77 चेंडूत 73 धावा केल्या असून एकदा आऊट झाला आहे. देवदत्त पडिक्कल 20 चेंडूत 16 धावा करुन एकदा आऊट झालाय. शिमरॉन हेटयमारने राशिदच्या 45 चेंडूंचा सामना करताना 63 धावा ठोकल्या. पण चार वेळा आऊट झाला. रियान परागने 7 चेंडूंवर 6 धावा केल्या. अश्विनने 6 चेंडूंवर 7 धावा केल्या. दोनदा आऊट झाला.

5 T 20 फायनलमध्ये 2 विकेट

राशिद खान आतापर्यंतच्या करीयरमध्ये 5 टी 20 फायनल खेळला आहे. यात त्याने दोन विकेट घेतल्यात. 5.27 च्या इकॉनमीने त्याने धावा दिल्यात. म्हणजे दबाव बनवून ठेवला. आजही त्याचा तोच प्रयत्न असेल.