GT vs CSK IPL 2023 Final Weather Report : आज पाऊस पडावा, अशीच Shubman Gill, गुजराच्या फॅन्सची इच्छा असेल, कारण…..

| Updated on: May 28, 2023 | 11:34 AM

GT vs CSK IPL 2023 Final Weather Report : अहमदाबादमध्ये आज फायनलच्या दिवशी कसं असेल हवामान? आणि पाऊस पडावा अशीच शुभमन गिलसह तमाम गुजरातच्या फॅन्सची इच्छा असेल.

GT vs CSK IPL 2023 Final Weather Report : आज पाऊस पडावा, अशीच Shubman Gill, गुजराच्या फॅन्सची इच्छा असेल, कारण.....
GT vs CSK IPL 2023 Final
Image Credit source: IPL
Follow us on

अहमदाबाद : IPL 2023 च्या फायनलमध्ये आज एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहेत. दोघांमध्ये चॅम्पियन कॅप्टन कोण? त्याचा फैसला अहमदाबादमध्ये होईल. आज आयपीएलच्या 16 व्या सीजनचा विजेता संघ ठरेल. अहमदाबादमध्ये आज हवामानाची स्थिती काय असेल? ज्या पीचवर मॅच होणार? ती विकेट कशी आहे? हे जाणून घेऊया.

आयपीएल अंतिम टप्प्यात असताना काही सामन्यांच्या आधी पाऊस कोसळला होता. त्यामुळे सामना पावसामुळे रद्द होणार की काय? अशी स्थिती होती. फक्त लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामधला लीग स्टेजचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

आज अहमदाबादमध्ये कसं असेल हवामान?

क्वालिफायर 2 मॅचच्या आधी पाऊस कोसळला होता. IPL 2023 ची फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे. या मॅचवर सुद्धा पावसाच सावट असणार का? हा प्रश्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाच्या आकाशात ढग असतील. पण पाऊस कोसळण्याची शक्यता नाहीय. त्यामुळे धोनी आणि CSK साठी ही दिलासादायक बाब आहे.

अहमदाबादच्या पीचवर पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमला किती संधी?

अहमदाबादच्या पीचवर धावा होतात. मागच्या 8 सामन्यात फर्स्ट इनिंगमध्ये सरासरी स्कोर 193 धावा होता. यात 8 पैकी 5 सामन्यात पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. IPL च्या ओव्हर ऑल सीजनवर नजर मारली, तर 40 वेळा पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. 32 वेळा धावांचा पाठलाग करणारी टीम विजय ठरली आहे. अशावेळी टॉस जिंकून काय निर्णय घ्यायचा? हे धोनी आणि हार्दिक दोघांना माहितीय.

अन्यथा रोहित-विराट बरोबर जे झालं, तेच धोनीसोबत होईल

अहमदाबादच्या पीच बद्दल बोलायच झाल्यास, पाऊस कोसळतो, तेव्हा शुभन गिलची बॅट गरजते. त्यामुळे आज काहीही करुन पाऊस कोसळू नये, अशीच CSK ला प्रार्थना करावी लागेल. कारण पाऊस झाला, तर धोनीसोबतही तेच होईल, जे बंगळुरुमध्ये विराट कोहली आणि क्वालिफायर 2 मध्ये रोहित शर्मासोबत झालं.

21 मे रोजी पाऊस पडल्यानंतर काय झालेलं?

21 मे रोजी बंगळुरुमध्ये RCB विरुद्ध GT सामना झाला. या मॅचआधी पाऊस कोसळला. नंतर शुभमन गिलची बॅट बरसली. प्लेऑफ प्रवेशासाठी महत्वाच्या सामन्यात विराट कोहलीने 101 धावा केल्या. त्याला शुभमन गिलने 52 चेंडूत 104 धावा ठोकून उत्तर दिलं. त्यामुळे गुजरात जिंकली. RCB चा प्लेऑफमधून पत्ता कट झाला.

26 मे रोजी सुद्धा पाऊस झाला पण त्यानंतर….

26 मे रोजी अहमदाबादमध्ये क्वालिफायर 2 चा सामना झाला. या मॅचआधी सुद्धा पाऊस झाला. सामना सुरु झाल्यानंतर शुभमन गिलने मैदानावर धावांचा पाऊस पाडला. मुंबई इंडियन्स यातून सावरु शकली नाही. गुजरात टायटन्सने शुभमनच्या शतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सवर 62 धावांनी विजय मिळवला.