GT vs MI Live Streaming : मुंबईसमोर गुजरातला सलग चौथ्या विजयापासून रोखण्याचं आव्हान, सामना किती वाजता?

Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2026 Live Scorecard : शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स आपल्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्ससा पराभूत करुन सलग आणि एकूण चौथा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

GT vs MI Live Streaming : मुंबईसमोर गुजरातला सलग चौथ्या विजयापासून रोखण्याचं आव्हान, सामना किती वाजता?
Shubman Gill and Hardik Pandya
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 20, 2026 | 3:03 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील सहावा सामना असणार आहे. गुजरातने या मोसमात सलग 2 सामने गमावले. त्यानंतर गुजरातने जोरदार कमबॅक केलं. गुजरातने पहिल्या 2 पराभवानंतर विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. तर दुसऱ्या बाजूला 2012 नंतर मोहिमेतील पहिला सामना जिंकणाऱ्या मुंबईने सलग 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे आता मुंबईसमोर गुजरातचा विजयरथ रोखण्यासह आपल्या पराभवाची मालिका खंडीत करण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी?

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना सोमवारी 20 एप्रिलला होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होईल.

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच मोबाईलवर पाहता येईल. तसेच https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकवर लाईव्ह ब्लॉगद्वारे सामन्यातील अपडेट जाणून घेता येतील.

मुंबई-गुजरात हेड टु हेड रेकॉर्ड्स

आयपीएल स्पर्धेतील आकडेवारी पाहता गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्स टीमवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. उभयसंघात सोमवारी 20 एप्रिलला होणारा नववा सामना असणार आहे. याआधी झालेल्या 8 पैकी सर्वाधिक सामने गुजरातने जिंकले आहेत. गुजरातने मुंबईला 5 वेळा पराभूत केलं आहे. तर मुंबईने 3 सामन्यांत गुजरातवर विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांची 19 व्या मोसमातील कामिगरी

ताज्या आकडेवारीनुसार, गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये 6 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स 2 गुणांसह सर्वात शेवटी अर्थात दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबई सोमवारी गुजरातला पराभूत करुन पॉइंट्स टेबलमध्ये उडी घेणार की नाही? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us