AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RR Live Streaming : राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, गुजरात रोखणार?

Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्यामुळे राजस्थान गुजरात विरुद्ध विजय मिळवून सलग दुसरा सामना जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

GT vs RR Live Streaming : राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, गुजरात रोखणार?
Gujarat Titans vs Rajasthan RoyalsImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 04, 2026 | 1:38 AM
Share

राजस्थान रॉयल्सने रियान पराग याच्या नेतृत्वात आयपीएल 2026 मध्ये विजयी सुरुवात केली.  राजस्थानने 30 मार्चला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करुन विजयी सलामी दिली. राजस्थानने चेन्नई सुपर किंग्सवर 8 विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला. राजस्थानने चेन्नईकडून मिळालेलं 128 धावांचं आव्हान हे 12.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं.  त्यानंतर आता राजस्थान आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध 2 हात करणार आहे.  गुजरात टायटन्सचाही हा या पर्वातील दुसरा सामना असणार आहे.  शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थानच्या नेतृत्वाची धुरा आहे. राजस्थानचा गुजरातला पराभूत करुन सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर गुजरातची पराभवाने सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात आता गुजरात पहिला विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार की राजस्थान सलग आणि एकूण दुसऱ्या सामन्यात जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  या निमित्ताने उभयसंघातील सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कधी?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना  शनिवारी 4 एप्रिलला होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कुठे?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला शनिवारी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहता येईल.

गुजरात राजस्थानवर वरचढ

दरम्यान गुजरात राजस्थान रॉयल्सवर वरचढ राहिली आहे. गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यात स्पर्धेच्या इतिहासात एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने या 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानला गुजरात विरुद्ध 2 सामन्यांतच विजय मिळवता आला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा