Video : रनआउट झाल्यानंतर हार्दिक पांड्या रागावला, त्यामुळे डेव्हिड मिलर हैराण

| Updated on: Apr 09, 2022 | 10:41 AM

IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स (GT) संघाने प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात गुजरातने पंजाब किंग्जचा (PKS) सहा गडी राखून सहज पराभव केला. कालचा सामना प्रेक्षकांसाठी अगदी रोमहर्षक होता. तसेच सामन्यादरम्यान उत्कंठा शिगेला पोहोचली होती. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) धावबाद झाल्यानंतर गुजरातचा विजय अवघड वाटत होता.

Video : रनआउट झाल्यानंतर हार्दिक पांड्या रागावला, त्यामुळे डेव्हिड मिलर हैराण
रनआउट झाल्यानंतर हार्दिक पांड्या रागावला
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स (GT) संघाने प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात गुजरातने पंजाब किंग्जचा (PKS) सहा गडी राखून सहज पराभव केला. कालचा सामना प्रेक्षकांसाठी अगदी रोमहर्षक होता. तसेच सामन्यादरम्यान उत्कंठा शिगेला पोहोचली होती. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) धावबाद झाल्यानंतर गुजरातचा विजय अवघड वाटत होता. मात्र राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) संघाला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सला शेवटच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज होती. अशा स्थितीत राहुल तेवतियाने ओडियन स्मिथच्या चेंडूवर सलग दोन षटकार खेचून संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

रनआउट झाल्यानंतर हार्दिकला रागावला

ओडिअन स्मिथ मॅचची अंतिम ओव्हर करत होता. त्यावेळी डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. त्या षटकाच्या पहिल्याच चेंडू डेव्हिड मिलर समजला नाही. तो बॉल त्याचा बॅटला सुध्दा लागला नाही. तरीही दोघे फलंदाज स्ट्राइक बदलण्यासाठी धावले. त्यावेळी, यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने विकेटच्या मागून डायरेक्ट हीट करत स्टंप टिपली. त्यामुळे हार्दिक रन आऊट झाला. हार्दिकला आऊट झाल्यानंतर त्याचा प्रचंड राग आल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी हार्दिक पांड्या सहकारी खेळाडू डेव्हिड मिलरवर चांगलाच रागावलेला दिसला. मात्र, हार्दिकने धाव घेण्याचे आवाहन केले होते. हार्दिक पंड्याच्या या प्रतिक्रियेने डेव्हिड मिलरही हैराण झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

गुजरात टायटन्सला शेवटच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज होती

कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सला शेवटच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज होती. अशा स्थितीत राहुल तेवतियाने ओडियन स्मिथच्या चेंडूवर सलग दोन षटकार खेचून संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. गुजरातकडून सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. दुसरीकडे, साई सुदर्शनने 35 आणि कर्णधार हार्दिक पंड्याने 27 धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जसाठी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक दोन खेळाडूंना बाद केले.

पंजाब किंग्जने नऊ गडी गमावत 189 धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने नऊ गडी गमावत 189 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने 27 चेंडूत 64 धावांचे योगदान दिले. सलामीवीर शिखर धवननेही 35 आणि जितेश शर्माने 23 धावांचे उपयुक्त योगदान दिले. गुजरात टायटन्सकडून राशिद खानला तीन आणि दर्शन नळकांडेला दोन विकेट मिळाल्या.

Sanjay Raut : अँटीसिपेटरी बेल के लिए तो चोर डकैत जाते है, नॉट रिचेबल असलेल्या सोमय्या पिता पुत्रांवर राऊतांची पुन्हा टीका

Mumbai | धक्कादायक! परळ डेपोजवळ बेशुद्धावस्थेत आढळले, मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Ajit Pawar On Police : हे निर्विवाद सत्य आहे, अजित पवारांचं मुंबई पोलीसांच्या अजाणतेपणावर थेट बोट, वळसे पाटलांची अडचण?