
India vs Sri Lanka Hardik Pandya: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात रोमांचक विजय मिळवला. टीम इंडियाने 2 रन्सनी हा सामना जिंकला. टीम इंडियाकडून दीपक हुड्डा, शिवम मावी आणि अक्षर पटेलने कमालीचा खेळ दाखवला. या खेळाडूंमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला. मॅच संपल्यानंतर हार्दिक पंड्याने खेळाडूंच तोंडभरुन कौतुक केलं.
स्वत:च्या तब्येतीबद्दल हार्दिक म्हणाला, की….
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्याच कॅच पकडताना कॅप्टन हार्दिक पंड्याला दुखापत झाली. त्यामुळे काहीवेळ तो मैदानाबाहेर होता. सामन्यानंतर हार्दिक म्हणाला की, “क्रॅम्प आला होता. माझ्यात लोकांना घाबरवण्याची प्रवृत्ती आहे. हा फक्त क्रॅम्प होता. मी आता हसतोय, याचा अर्थ सर्वकाही ओके आहे. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही. तब्येत बरी नव्हती. पाणी कमी झालेलं”
मला टीमला कठीण प्रसंगात टाकायच आहे
शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 13 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिकने अक्षर पटेलच्या हाती चेंडू सोपवला. या निर्णयाबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला की, “मला टीमला कठीण प्रसंगात टाकायच आहे. त्यामुळे मोठ्या सामन्यात मदत मिळेल. द्विपक्षीय सीरीजमध्ये आम्ही चांगली कामगिरी करतो. युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय”
शिवम मावीबद्दल हार्दिक म्हणाला….
हार्दिक पंड्याने शिवम मावीच तोंडभरुन कौतुक केलं. डेब्यु मॅचमध्ये शिवमने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 4 विकेट काढल्या. “शिवम मावीला मी आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहिलय. त्याची ताकत काय आहे, ते मला माहितीय. मी त्याला फक्त नॅचरल बॉलिंग करायला सांगितली. माझा पूर्ण पाठिंबा आहे. फलंदाजाने मोठे फटके खेळले तरी हरकत नाही, हे मी त्याला सांगितलं” असं हार्दिक म्हणाला.