AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, CSK vs RR: शिवम दुबेची विकेट कशी काढली? रवींद्र जडेजाने इनिंग संपताच सांगितलं कारण

आयपीएल 2026 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा बार फुसका निघाला. चेन्नईचा संपूर्ण संघ अवघ्या 127 धावांवर बाद झाला. या सामन्यात चेन्नईचा जुना सहकारी असलेल्या रवींद्र जडेजाने 3 षटकात 18 धावा देत 2 विकेट काढल्या. यात शिवम दुबेची विकेट खास होती.

IPL 2026, CSK vs RR: शिवम दुबेची विकेट कशी काढली? रवींद्र जडेजाने इनिंग संपताच सांगितलं कारण
IPL 2026, CSK vs RR: शिवम दुबेची विकेट कशी काढली? रवींद्र जडेजाने इनिंग संपताच सांगितलं कारणImage Credit source: Rajasthan Royals Twitter
| Updated on: Mar 30, 2026 | 9:54 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले. या सामन्यावर पूर्णपणे राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा दिसला. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना कुठेच डोकं वर काढता आलं नाही. चेन्नई सुपर किंग्सने 19.4 षटकात सर्व गडी गमवून 127 धावा केल्या. तसेच विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीसमोर एकही फलंदाज तग धरू शकला नाही. या सामन्यात रवींद्र जडेजाची गोलंदाजी लक्षवेधी ठरली. कारण त्याने एकाच षटकात दोन विकेट काढल्या. यात शिवम दुबेची विकेट खास होती. कारण त्याने आल्या आल्याच रवींद्र जडेजाला षटकार मारला होता. त्यामुळे डोकेदुखी ठरेल असं वाटत होतं. पण दोन चेंडू निर्धाव टाकले आणि शेवटच्या चेंडूवर त्याची विकेट काढली. ही विकेट कशी काढली त्याबाबत सांगितलं.

रवींद्र जडेजा म्हणाला की, ‘मी शिवम दुबेला खूप काळापासून ओळखतो. मी नेटमध्ये त्याला गोलंदाजी केली आहे, त्यामुळे तो फिरकी गोलंदाजांना कसा सामोरा जातो हे मला माहीत आहे. मी त्यासाठी तयार होतो आणि ऑफ-स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. कारण मला माहीत होतं की तो माझ्याविरुद्ध मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल.मला वाटलं की खेळपट्टी थोडी चिकट होती आणि चेंडू वळत होता, त्यामुळे मला गोलंदाजी करायला खूप मजा आली. माझं काम फक्त योग्य ठिकाणी चेंडू टाकणं आणि बाकीचं काम खेळपट्टीवर सोपवणं हे होतं.’

रवींद्र जडेजाने या सामन्यात तीन षटकं टाकली आणि 18 धावा देत 2 विकेट काढल्या. यात सरफराज खान आणि शिवम दुबेची विकेट काढली. रवींद्र जडेजाला राजस्थान रॉयल्समध्ये परतल्यावर कसं वाटते असा प्रश्नही विचारला गेला. तेव्हा रवींद्र जडेजा म्हणाला की, मला वाटतं की गुलाबी रंग मला चांगला दिसतो. रवींद्र जडेजा मागची 12 वर्षे चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. या स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या ट्रेड झालं. यात संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडे, तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये आला. संजू सॅमसनने पहिल्या सामन्यात फक्त 6 धावा केल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...