मेंदूत रक्ताची गाठ कशी होते आणि त्याचे धोके काय? क्रिकेटपटू विनोद कांबळीला झालेला नेमका आजार काय? जाणून घ्या

क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या ढासळलेल्या प्रकृतीमुळे अनेकांना त्याची चिंता लागून आहे. आता त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ब्रेन स्टोक्सचा धोका वाढला आहे. चला जाणून घेऊयात असं का होतं?

मेंदूत रक्ताची गाठ कशी होते आणि त्याचे धोके काय? क्रिकेटपटू विनोद कांबळीला झालेला नेमका आजार काय? जाणून घ्या
मेंदूत रक्ताची गाठ कशी होते आणि त्याचे धोके काय? क्रिकेटपटू विनोद कांबळीला झालेला नेमका आजार काय? जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 17, 2026 | 6:43 PM

क्रिकेट विश्वात एक काळ गाजवणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक आहे. सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि दिवंगत रमाकांत आचरेकर यांचा शिष्य म्हणून त्याची ओळख आहे. पण त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला उतरती कळा लागली आणि सर्व काही गमवत गेला. विनोद कांबळी 29 ऑक्टोबर 2000 साली श्रीलंकेविरुद्ध शारजाहमध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर पुन्हा मैदानात दिसला नाही. त्यामुळे बराच कालावधी लोटला आणि अचानक सार्वजनिक व्यासपीठावर त्याचं दर्शन घडलं. वर्ष 2025 मध्ये मुंबईत दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीसभा कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती. तेव्हा त्याला पाहून अनेकांना धक्का बसला. कारण त्याची प्रकृती पूर्णपणे ढासळली होती. इतकंच व्यासपीठावर कसा बसा पोहोचला होता. त्याला सचिन तेंडुलकरचा आधार घ्यावा लागला होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या काळजात धस झालं. असं असताना मागच्या आठवड्यात त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ तयार झाल्याचं समोर आलं. त्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच काय तर ब्रेन स्टोक्सचा धोका असल्याचं बोललं जात आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us