Shardul Thakur: ‘हो, मी खराखुरा ऑलराऊंडर’, शार्दुल ठाकूरने हार्दिक पंड्या बाबतही केलं वक्तव्य

| Updated on: Feb 03, 2022 | 12:06 PM

मागच्या काही महिन्यांमध्ये पालघरच्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) जबरदस्त कामगिरी केली आहे. संघाच्या गरजेनुसार, बॉल आणि बॅटने त्याने कमाल दाखवली आहे.

1 / 10

2 / 10
शार्दुलचा गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. पण आता क्रिकेटप्रेमींचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून गेला आहे. ते शार्दुल ठाकूरकडे ऑलराऊंडर म्हणून पाहतात.

3 / 10
कारण संघाला गरज असताना त्याने चांगल्या धावाही केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा असो किंवा दक्षिण आफ्रिका, दोन्ही ठिकाणी त्याने फलंदाज म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

4 / 10
पालघरचा हा तरुण क्रिकेटपटू टीम इंडियाचा आज एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

5 / 10
शार्दुल इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या खेळाबद्दल व्यक्त झाला आहे.

6 / 10
माझ्यामध्ये टॅलेंट होते. पण मला रणजी करंडक स्पर्धेत फलंदाजीची पुरेशी संधी मिळाली नाही.

7 / 10
भारतीय संघात निवड झाल्यानंतर मला फलंदाजीची जास्त संधी मिळाली. मी चांगला फलंदाज होतो. माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी मला सातव्या आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली. माझ्याकडे जे काही टॅलेंट होते, त्यानुसार मी खेळ केला.

8 / 10
तू स्वत:ला खराखुरा ऑलराऊंडर समजतोस का ? या प्रश्नावर तो म्हणाला की, "हो, मी स्वत:ला खराखुरा ऑलराऊंडर समजतो. जेव्हा केव्हा मला संधी मिळेल, तेव्हा चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. सातव्या क्रमांकावर येऊन जेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी करता, तेव्हा भागीदाऱ्या होतात, संघाला चांगली धावसंख्या उभारता येते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघांकडे बघा, खालच्या क्रमांकावर येऊन योगदान देणारे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्याने मोठा फरक पडतो असे शार्दुल म्हणाला.

9 / 10
शार्दुल ठाकूरची सतत हार्दिक पंड्या बरोबर तुलना होते, त्यावर तो म्हणाला की, "माझी हार्दिक बरोबर कुठलीही स्पर्धा नाहीय. हार्दिक लवकर फिट होऊन संघात परतेल. आमच्या दोघांची फलंदाजीची पद्धत वेगवेगळी आहे. हार्दिक पाचव्या किंवा सहाव्या मी सातव्या किंवा आठव्या नंबरवर फलंदाजी करतो. आमच्या दोघांमध्ये कुठलीही स्पर्धा नाहीय"

10 / 10
"हार्दिकची जागा वैगेर घेण्याचा माझा काही विचार नाहीय. माझ्या माहितीनुसार, हार्दिकने नेहमीच मला पाठबळ दिलं आहे. नेहमीच त्याने त्याचे अनुभव मला सांगितलेत. मर्यादीत षटकांमध्ये जास्त ऑलराऊंड संघात खेळणार असतील, तर ती चांगली गोष्ट आहे" असे शार्दुल म्हणाला.