IND vs IRE: हार्दिक खूश झाला, थेट आयर्लंडच्या खेळाडूला गिफ्ट केली बॅट

| Updated on: Jun 28, 2022 | 3:35 PM

भारताचा एक संघ इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्याची तयारी करतोय, त्याचवेळी दुसरा संघ आयर्लंड मध्ये टी 20 सीरीज (T 20 Series) खेळतोय.

IND vs IRE:  हार्दिक खूश झाला, थेट आयर्लंडच्या खेळाडूला गिफ्ट केली बॅट
harry tactor
Follow us on

मुंबई: भारताचा एक संघ इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्याची तयारी करतोय, त्याचवेळी दुसरा संघ आयर्लंड मध्ये टी 20 सीरीज (T 20 Series) खेळतोय. आज या मालिकेतील दुसरा शेवटचा सामना आहे. रविवारी पहिल्या टी 20 सामन्यात भारताने आयर्लंडवर सात विकेट राखून मोठा विजय मिळवला. आयर्लंडने दिलेले 109 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. दीपक हुड्डाने (Deepak Hooda) भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पावसामुळे हा सामना 20 ऐवजी 12 षटकांचा खेळवण्यात आला. भारताने आयर्लंडच्या संघाला सुरुवातीलाच धक्के दिले. भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar kumar) आयर्लंडचा कॅप्टन अँड्रयू बालर्बिनीला पहिल्याच ओव्हरमध्ये पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर हार्दिक पंड्याने अनुभवी पॉल स्टर्लिंगला माघारी धाडलं. आवेश खानने गॅरेथच्या रुपात तिसरी विकेट काढली. पावरप्लेमध्ये आयर्लंडची 22/3 अशी स्थिती होती.

आयर्लंडचा संघ हा सामना हरला, पण….

आयर्लंडचा डाव 100 धावातच आटोपतो की, काय असं वाटत होतं. पण 22 वर्षाच्या हॅरी टेक्टरने असं होऊ दिलं नाही. त्याने आयर्लंडसाठी किल्ला लढवत शानदार खेळ दाखवला. त्याने 33 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याच्या धुवाधार फलंदाजीमुळे आयर्लंडने 12 ओव्हरमध्ये चार बाद 108 धावा केल्या. आयर्लंडचा संघ हा सामना हरला. पण टेक्टरच त्याने खेळलेल्या इनिंगबद्दल खूप कौतुक करण्यात आलं.

हार्दिकने गिफ्ट केली बॅट

भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने या आयरिश फलंदाजाच कौतुक केलं व त्याला आपल्याजवळची बॅट गिफ्ट म्हणून दिली. योग्य मार्गदर्शन मिळालं, तर 22 वर्षांचा हॅरी चांगलं नाव कमवेल. टेक्टरला आयपीएलमध्ये लवकरच संधी मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. “त्याने खरोखर काही फटके खूप चांगले खेळले. तो फक्त 22 वर्षांचा आहे. मी त्याला बॅट दिलीय. त्याने तो अजून जास्त षटकार मारुन आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळवेल” असा विश्वास हार्दिकने व्य़क्त केला.