Video : सीमेवर झेल पकडण्याचा नियमात मोठा बदल, अशा पद्धतीने पकडला तर निर्णय फलंदाजाच्या पक्षात

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने झेल पकडण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे. हा नवा नियम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 मालिकेच्या सुरुवातीपासून लागू होणार आहे. सीमेवर झेल पकडताना आता सीमेबाहेर क्षेत्ररक्षकाला एकदाच हवेत उडी मारता येणार आहे.

Video : सीमेवर झेल पकडण्याचा नियमात मोठा बदल, अशा पद्धतीने पकडला तर निर्णय फलंदाजाच्या पक्षात
सीमेवर झेल पकडण्याच्या नियमात बदल
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 14, 2025 | 7:16 PM

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सीमेवर झेल पकडण्याच्या नियमात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मेरीलेबोन क्रिकेट क्लबने झेलबाबतचा नियम आधीच आयसीसीकडे सुपूर्द केला होता. यावर आता शिक्कामोर्तब झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 च्या पर्वापासून हा नियम लागू झाला आहे. नव्या नियमानुसार बनी हॉप पद्धतीने झेल पकडणं बाद मानलं जाणार नाही. जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडताना पहिल्यांदा सीमेबाहेर गेला असेल तर दुसऱ्यावेळी तो आत असणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा की क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर उभे राहून चेंडूला दोनदा स्पर्श करू शकत नाही. तसेच सीमारेषेच्या बाहेरून चेंडू हवेत फेकू शकत नाही. आयसीसीने आता बनी हॉप झेल घेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येत्या काळात क्षेत्ररक्षक मैदानाबाहेर उभे राहून हवेत चेंडू फेकू शकणार नाहीत. आता हा झेल मानला जाणार नाही आणि फलंदाजाला धाव मिळेल.17 जून रोजी गॉल येथे होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात आयसीसीने नवीन झेल नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

2023 मध्ये अशा पद्धतीने झेल पकडण्यावरून वादाला फोडणी मिळाली होती. सिडनी सिक्सर्स विरुद्धच्या सामन्यात ब्रिस्बेन हीटचा मायकेल नेसरने सीमारेषेच्या बाहेर जाऊन हवेत उडी मारून चेंडू पकडला. तसेच हवेत असताना मैदानात फेकला आणि नंतर पकडला. पंचांनी फलंदाजाला बाद दिलं होतं. अनेक लीगमध्ये बनी हॉप झेल घेण्याचे प्रयत्नही झाले. 2020 मध्ये, बीबीएलमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान, मॅथ्यू वेडच्या सीमारेषेवर कॅच आउटबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

आता क्षेत्ररक्षक सीमा रेषेबाहेर गेल्यानंतर एकदाच हवेत उडी मारू शकतो. म्हणजेच बाहेरून एकदा का आत चेंडू फेकला की दुसरी उडी आत घ्यावी लागेल. अन्यथा झेल बाद दिला जाणार नाही. तसेच यापूर्वी एक क्षेत्ररक्षक सीमेबाहेरून हवेतच चेंडू आत फेकायचा. त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक झेल पकडायचा. पण आता दोन्ही खेळाडूंना सीमेच्या आत असणं आवश्यक आहे. अन्यथा फलंदाजाच्या बाजूने निर्णय लागेल.