AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला ही चूक नडली, जर तसं झालं नसतं तर…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह आयसीसी स्पर्धेचं दुसरं जेतेपद मिळवलं आहे. यापूर्वी 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. दुसरीकडे, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पराभवाला एक चूक कारणीभूत ठरली.

Video : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला ही चूक नडली, जर तसं झालं नसतं तर...
बावुमाचा झेल स्मिथने सोडलाImage Credit source: video grab
| Updated on: Jun 14, 2025 | 5:26 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडलं. पहिल्या डावाता 74 धावांनी पिछाडीवर असूनही दुसऱ्या डावात समोर असलेल्या 282 धावांचा यशस्वी पाठलाग केला. खरं तर लॉर्ड्सवर 282 धावांचं आव्हान खूपच मोठं होतं. कारण यापूर्वी असा चमत्कार करणं वेस्ट इंडिज संघालाच शक्य झालं होतं. मात्र त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने ही किमया साध्य केली आहे. विजयी धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेला पहिला धक्का 9 धावांवर बसला होता. त्यानंतर दुसरी विकेट 70 धावांवर गेली आणि दडपण वाढलं. 76 धावा असताना दक्षिण अफ्रिकेला तिसरा धक्का बसला असता. पण एक चुकीमुळे ऑस्ट्रेलिया जेतेपदापासून दूर गेली. एक चूक ऑस्ट्रेलियाला 64 धावांनी महाग पडली. तसेच दक्षिण अफ्रिकेवर दडपण आणण्याची एक मोठी संधी सोडली. यामुळे ऑस्ट्रेलियाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये तिसरा चॅम्पियन मिळाला आहे.

कर्णधार पॅट कमिन्सने संघाचं 20 वं षटक मिचेल स्टार्कच्या हाती सोपवलं. दोन विकेट गेल्याने दक्षिण अफ्रिका संघावर दडपण वाढलं होतं. पहिल्या चेंडूवर सेट बॅट्समन मार्करमने एक धाव करून बावुमाला स्ट्राईक दिली. दुसऱ्या चेंडूचा सामना करताना बावुमा बसला आणि थेट स्मिथच्या हातात चेंडू गेला. पण हा झेल पकडताना स्मिथ चुकला आणि हातात आलेली विकेट गेली. त्यात स्मिथच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि थेट मैदानाबाहेर गेला. जेव्हा बावुमाची विकेट सोडली तेव्हा तो 8 चेंडू खेळून फक्त 2 धावांवर होता. मात्र त्याने एका बाजुने खिंड लढवली. एडन मार्करमसोबत 147 धावांची भागीदारी केली. त्याने यावेळी 134 चेंडूत 5 चौकार मारत 66 धावा केल्या. वाबुमाची विकेट सोडल्याने 64 धावांचा फटका बसला. तसेच दक्षिण अफ्रिकेवरील दडपणही कमी झालं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-2021 च्या पहिल्या पर्वात न्यूझीलंडने भारताला पराभूत करत पहिल्यांदा जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2021-2023 या दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विजयश्री मिळवला होता. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 6 गडी राखून पराभूत केलं आणि जेतेपद मिळवलं. दक्षिण अफ्रिकेची दुसरी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी 1998 मध्ये दक्षिण अफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. म्हणजेच 27 वर्षानंतर दुसरं जेतेपद मिळवलं आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.