
हरारे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा 2023 आयोजन हे भारतात करण्यात आलंय. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 8 संघांनी थेट एन्ट्री मिळाली. मात्र आयसीसी क्वालिफायर्स स्पर्धेत खेळून श्रीलंका आणि नेदरलँड या सघांनी आपलं तिकीट कन्फर्म केलं. झिंबाब्वेला पराभूत करत श्रीलंका वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणारी नववी टीम ठरली. तर नेदरलँडने स्कॉटलँडचा धुव्वा उडवत 12 वर्षांनी वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. अशा प्रकारे या स्पर्धेसाठी दहाच्या दहा संघ निश्चित झाले आहेत. मात्र आता वर्ल्ड कप स्पर्धेआधी श्रीलंका विरुद्ध नेदरलँड यांच्यात आयसीसी क्वालिफायर्स फायनल महामुकाबला होणार आहे.
या पात्रता स्पर्धेतील महाअंतिम सामना हा रविवारी 9 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब इथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणा आहे. दासून शनाका हा श्रीलंकेचं नेतृ्त्व करणार आहे. तर स्कॉट एडवर्ड्स याच्याकडे नेदरलँड क्रिकेट टीमची जबाबदारी असणार आहे.
श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
Picture perfect ?? ??
They might have booked their tickets to India but the #CWC23 Qualifier trophy is still in play ? pic.twitter.com/GfZSIuOYPr
— ICC (@ICC) July 8, 2023
सुपर 6 फेरीआधी साखळी सामन्यात एकूण 10 संघ होते. या 10 संघाची एकूण 2 गटांमध्ये प्रत्येकी 5 अशा प्रकारे विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक टीम आपल्या गटातील 4 संघाविरुद्ध प्रत्येकी 1 सामने खेळली. यामध्ये श्रीलंकेने 4 सामन्यात विजय मिळवला. श्रीलंकेने स्कॉटलँड, ओमान, आयर्लंड आणि यूएईवर विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला नेदरलँडने 4 पैकी 3 सामन्यात झिंबाब्वेचा अपवाद वगळता यूएसए, नेपाळ आणि विंडिजवर मात केली.
दरम्यान नेदरलँड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुपर 6 मधील दुसऱ्याच सामन्यात लढत झाली. हा सामना 30 जून रोजी खेळवण्यात आला. श्रीलंकेने नेदरलँडचा या सामन्यात 21 धावांनी पराभव केला. त्यानंतर आता 9 जुलै रोजी उभयसंघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत. त्यामुळे आता श्रीलंकेला नेदरलँडला सलग दुसऱ्यांदा पराभूत करत चॅम्पियन ठरण्याची संधी आहे. तर नेदरलँडचा श्रीलंकेला एकदाच पण कायम लक्षात राहिल असं पराभूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.
श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, सहान अरचिगे, दुशन हेमंथा, महेश थेक्षाना, दिलशान मदुशंका, मथीशा पाथिराना, धनंजया सिल्वामे, करुणारत्ने, करुणारत्ने, सहान अरचिगे रजिथा, वानिंदू हसरंगा आणि लाहिरू कुमारा.
नेदरलँड क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, वेस्ली बॅरेसी, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रायन क्लेन, आर्यन दत्त, क्लेटन फ्लॉयड, व्हिव्हियन किंगमा, शरीझ अहमद, मायकेल लेविट आणि नोहा क्रोएस.