
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील जेतेपदासाठी आता फक्त तीन सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. दोन उपांत्य आणि एक अंतिम फेरीचा सामना होणार आहे. उपांत्य फेरीच्या दोन लढतीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. 4 मार्च रोजी दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड भिडणार आहेत. तर 5 मार्चला भारत आणि इंग्लंड आमनेसामने असतील. या तीन सामन्यांसाठी आयसीसीने सामना अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. या सर्व सामनाधिकाऱ्यांची निवड एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरी आणि पंचांमधून करण्यात आली आहे. उपांत्य फेरीत पाच पाच असे दोन गट पाडण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला सामना 4 मार्चला होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार 6.30 वाजता नाणेफेकीचा कौल होईल. त्यानंतर 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून रिचर्ड इलिंगवर्थ आणि एलेक्स वार्फ यांची निवड करण्यात आली आहे. तर भारताच्या नितीन मेनन यांना तिसरा पंच म्हणून जबाबदारी दिली आहे. तर रॉड टकर चौथे पंच असतील. त्याचबरोबर जवागल श्रीनाथकडे सामनधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. रिचर्ड इलिंगवर्थ यांनी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पंचगिरी केली होती. एलेक्स वार्फ या स्पर्धेत न्यूझीलंडविरूद्धच्या एका ग्रुप सामन्यात पंच म्हणून होते. तर नितीन मेनन यांना त्यांच्या अनुभवासाठी तिसऱ्या पंचाची जबाबदारी दिली आहे.
The #T20WorldCup semi-finals match officials have been confirmed.@emirates | Details 👇https://t.co/OpwxAjyGTJ
— ICC (@ICC) March 3, 2026
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून ख्रिस गॅफेनी आणि अलाउद्दीन पालेकर जबाबदारी सांभाळतील. एड्रियन होल्डस्टॉक तिसरे पंच असतील. तर पॉल रिफेल चौथे पंच म्हणून जबाबदारी सांभाळतील. तर अँडी पायक्राफ्ट यांच्या सामनाधिकारी पदाची धुरा असेल. ख्रिस गॅफेनीने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पंचगिरी केली होती. हा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. उलाउद्दीन पालेकरने इंग्लंडच्या दोन आणि भारत-नेदरलँड सामन्यात कर्णधारपद भूषवलं होतं.