ICC ODI Rankings: विराट कोहली दुसऱ्या स्थानावर कायम, क्विंटन डि कॉक टॉप पाचमध्ये

ICC ने वनडे क्रिकेटमधील फलंदाजांची रँकिंग जारी केली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

ICC ODI Rankings: विराट कोहली दुसऱ्या स्थानावर कायम, क्विंटन डि कॉक टॉप पाचमध्ये
Virat Kohli
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 5:34 PM

मुंबई: ICC ने वनडे क्रिकेटमधील फलंदाजांची रँकिंग जारी केली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर ICC ने ही रँकिंग जारी केली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकलेला रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराट कोहलीला वनडे कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं. त्याने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतक झळकावली.

दक्षिण आफ्रिकेने मायदेशातील दौऱ्यात पहिल्यांदाच भारतावर क्लीन स्वीप विजय मिळवला. तीन सामन्यात 80 पेक्षा कमी स्ट्राइक रेटने विराटने 116 धावा केल्या. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 169 धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. शिखर धवनच्या रँकिंगमध्ये 15 स्थानांची सुधारणा झाली आहे.

दुसऱ्या वनडेमध्ये 85 धावांची खेळी करणारा ऋषभ पंतच्या क्रमवारीत पाच स्थानांची सुधारणा झाली आहे. तो आता 82 व्या स्थानावर आहे. वर्ल्डकप 2019 नंतर क्विंटन डि कॉकने पहिल्यांदाच टॉप पाच मध्ये प्रवेश केला आहे. केपटाऊमध्ये 124 धावांची मॅचविनिंग शतकी खेळी केली. डि कॉकने या सीरीजमध्ये एकूण 229 धावा केल्या.