
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या आणि एकूण 25 व्या सामन्यात यजमान यूनायटेड स्टेट्स टीम विरुद्ध टॉस जिंकला आहे. टीम इंडियाने नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये फिल्डिंगचा निर्णय घेत यूएसएला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्याला थोड्यात वेळात रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी यजमान टीमला मोठा झटका लागला आहे. दुखापतीमुळे यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेल हा या सामन्यात खेळणार नाहीय. त्यामुळे मुळचा गुजरातचा असलेल्या मोनांक याचं आपल्या घरच्या संघांविरुद्ध खेळण्याचं स्वप्नही अधुर राहिलं आहे.
मोनांक पटेल याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. मोनांकला या दुखापतीमुळे टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे. मोनांकच्या अनुपस्थितीत उपकर्णधार असलेल्या आरोन जोन्स याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच आरोन जोन्स याने वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 11 सिक्स ठोकून यूएसएला कॅनडा विरुद्ध विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
दरम्यान यूएसए संघाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. कॅप्टन मोनांक पटेल हा खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे कॅप्टनच्या जागी शायन जहांगीर याला संधी देण्यात आली आहे. तर नॉथुश केंजिगे याला बाहेर बसवत शॅडली व्हॅन शाल्कविक याचा समावेश करण्यात आला आहे.
युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.