AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs NZ SF Toss : न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेज करण्याचा निर्णय, दोन्ही संघांकडून बदल

South Africa vs New Zealand Semi Final Toss and Playing 11 : दक्षिण आफ्रिका आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध वरचढ असल्याचं आकड्यातून स्पष्ट होतं. अशात आता न्यूझीलंड या निर्णायक सामन्यात मैदान मारण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

SA vs NZ SF Toss : न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेज करण्याचा निर्णय, दोन्ही संघांकडून बदल
Mitchell Santner SA vs NZ Semi Final TossImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 04, 2026 | 8:07 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 52 सामन्यांनंतर उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले. यंदा गतविजेता इंडिया, गतउपविजेता दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या 4 संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात आज 4 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मिचेल सँटनर याने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेज करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायक सामन्यासाठी दोन्ही संघांकडून बदल करण्यात आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडून 3 बदल

न्यूझीलंडचा मॅचविनर गोलंदाज मॅट हेन्री स्पर्धेदरम्यान मायदेशातून परतला आगहे. तर प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल करण्यात आला आहे.ईश सोढी याच्या जागी जेम्स निशाम याचा समावेश करण्यात आला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने तब्बल प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. मार्को यान्सेन, डेव्ही़ड मिलर आणि कगिसो रबाडा या तिघांचं कमबॅक झालं आहे. या तिघांना सुपर 8 मधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात झिंबाब्वे विरुद्ध विश्रांती देण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडवर वरचढ

टी 20i क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड वरचढ असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होतं. उभयसंघात एकूण 19 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 19 पैकी 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 7 सामने जिंकले आहेत.

न्यूझीलंडची सेमी फायनलमधील कामगिरी

दरम्यान न्यूझीलंडची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे. न्यूझीलंडला याआधी उपांत्य फेरीतील 4 पैकी 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. तर न्यूझीलंडने एकदाच अंतिम फेरीत धडक दिली होती.

तसेच न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही सहावी वेळ ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने याआधीच्या पाचही सामन्यात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत केलं आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका विजयी षटकार लगावणार की न्यूझीलंड विजयाचं खातं उघडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टीम सायफर्ट (विकेटकीपर), फिन लन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स निशम, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोंची, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडेन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हीस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; शिवसैनिकांना काय दिले आदेश?.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; शिवसैनिकांना काय दिले आदेश?