AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs NZ, T20 Semi Final Live Streaming : दक्षिण आफ्रिकेला सलग दुसऱ्यांदा फायनलची संधी, न्यूझीलंड रोखणार?

when and where to watch South Africa Marathi vs New Zealand Marathi Semi Final match Live Streaming in Marathi: आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ कोणता असणार? हे दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

SA vs NZ, T20 Semi Final Live Streaming : दक्षिण आफ्रिकेला सलग दुसऱ्यांदा फायनलची संधी, न्यूझीलंड रोखणार?
Mitchell Santner and Aiden Markram SA vs NZ Semi FinalImage Credit source: News 9
| Updated on: Mar 04, 2026 | 4:54 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेत आता फक्त उपांत्य फेरीतील 2 आणि अंतिम फेरी असे एकूण 3 सामनेच बाकी आहेत. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात गतउपविजेत्या दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडचाही एकूण दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या प्रयत्नात दोघांपैकी कोण यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मिचेल सँटनर उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मार्करम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दक्षिण आफ्रिकेने 2024 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानवर मात करत अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र अंतिम फेरीत त्यांना भारताकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे यंदा दक्षिण आफ्रिकेची ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात त्याआधी दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड विरुद्ध कशी कामगिरी करते याकडे क्रिकेट रसिकांचं बारीक लक्ष असणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना कधी?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना बुधवारी 4 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकवर सामन्यातील प्रत्येक अपडेट आणि लाईव्ह स्कोअर जाणून घेता येईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.